संध्याकाळची काॅफी

Started by Shubhangi Gaikwad, May 18, 2020, 10:34:44 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

हवेत चांगलाच गारवा होता
त्यात संध्याकाळची वेळ
सज्जात आले घेऊन पेला काॅफीचा
घालण्यास त्यासवे निसर्गाचा मेळ

समोर पश्चिम दारात सूर्य होता वाट पाहत
गुलाबी किरणानी करत होता बाय बाय
दिवसभर सोनेरी प्रखर किरणांनी तळपून
झालीे वेळ परतीची आता तो दमलाय

सभोवती पसरलाय हिरवागार गालीचा
  वार्यासवे डोलत आहेत नाजूक फुलं
फुलांसवे बागडत आणि मस्ती करत
गेली आता थकून सारी मूलं

सभोवती झाडे विस्तीर्ण होती ऊभी
फांद्या पसरून  वाट पाहाती आतुरतेनं
परतूनी आली चिमणी पाखरं
कुशीत शिरूनी झाडाच्या,जाती बिलगूनं

काॅफीच्या प्रत्येक घोटासोबत भिरभिरती
नजर निसर्गातले सुंदर क्षण टिपत होती
सूर्यास्ताच्या गुलाबी किरणांची शाल पांघरून
थंडीही आता गुलाबी झाली होती

काॅफीचा कप आता पूर्णपणे खाली होऊन
टीपलेल्या सुखद क्षणांनी मन भरून गेले होते
सूर्यास्तानंतर सार जग शांत झाले होते
रिकाम्या कपाला काॅफी शिवाय करमत नव्हते


शुभांगी गायकवाड