चुकलं का त्याचं काही

Started by Shilpa Mohite, May 25, 2020, 08:59:06 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प ८ वे
        चुकलं का त्याचं काही

आजूबाजूला मृत्यू वावरतोय
तरी माणूस जगण्यासाठी धडपडतोय

चुकलं का त्याचं काही
जो कुटुंबासाठी तडफडतोय

हाती नाही काम, घरात नाही अन्न
कोरोनाआधीच जीव मरणासन्न

मास्क,सॅनिटायझर, सामाजिक अंतर
हे सारे आठवते भूक भागल्यानंतर

व्यवस्थेवरचा ताण वाढवावा
त्याच्यापासून हा कोसो दूर कावा

गावाची ओढ बसू देत नाही स्वस्थ
वाट मिळेल तिकडे तो फिरतो अस्वस्थ

मनात फक्त एकच गाव जवळ करावं
काहीही करून आपल्या माणसांत जावं

लपत-छपत,चालत-चालत जवळ करतोय गाव
तिथेही त्याच्या कपाळी नियतीचे क्रूर घाव

कुणावरही त्याचा आता विश्वास उरला नाही
पैशाशिवाय सर्व व्यर्थ, चुकलं का त्याचं काही
               
                       -शिल्पा मोहिते