मनाचीये गुंती

Started by Prasad Chindarkar, March 02, 2010, 11:45:10 AM

Previous topic - Next topic

Prasad Chindarkar

मनाचीये गुंती

मनाचीये गुंती
कोडे कसे उकलावे
करावा प्रयास
मनोमनी

मन हे अनोखे
करी कैसे चमत्कार
एका क्षणात पोहोचे
दूर नभी पल्याड

या मनाचे पारडे
कधी खाली कधी वर
कसे समजावू या मनाला
करीतसे गडबड

जसे सागरा उधाण
अगदी तसेच मनाचे
कधी बेभान वाऱ्याचे
होऊनिया वागतसे

मन चंचल चंचल
हे उधळते चौखूर
कधी हळवे हळवे
हे प्रेमात आतुर

                ...................प्रसाद  8)

nirmala.


amoul

chann aahe kavita!!

मन चंचल चंचल
हे उधळते चौखूर
कधी हळवे हळवे
हे प्रेमात आतुर

hya oli tar farach aavadalya

santoshi.world

छान आहे........... सगळ्याच ओळी आवडल्या   :) ..........