लेखणी माझं प्रेम

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 27, 2020, 10:51:33 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.लेखणी माझं प्रेम*

लिहावं कुणासाठी म्हणून
लेखणी सोबतीला घेतो
ती देत असते वाट दाखवून
मी तिच्या मागे चालत असतो

घाव होऊ लागतात दुसऱ्याची
स्तुती तिच्या तोंडून ऐकतांना
जखम खोलवर होऊ लागते
पावला मागून पावलं टाकतांना

मागील पाने उलटली जातात
तिच्याशी गप्पांना रंगत येऊन
मूड ऑफ होतो कधी कधी
तिच्या आठवणी सोबत घेऊन

ती आठवणीत असते नेहमी
पण तिचं प्रेम विश्वासू होतं
तिनं केल्या प्रेमाच्या गप्पांनी
डोळ्यातलं आभाळ भरून येतं

ती होतीच अशी मला सोडून
कोणाशी मिसळून घेत नव्हती
मीचं तिचं विश्व होतो मीचं सुख
माझ्या दुःखात ही तिचं सोबती

त्या वेळेस पाऊस ही तिचा होता
यायचा आसवांना लपवण्यासाठी
आता आसवंच येतात पाऊस होऊन
जखमांना थोडा ओलावा देण्यासाठी

✍🏻(कविराज. अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर