कोरोनाचा करूया प्रतिकार

Started by Prashant Jain, June 07, 2020, 04:57:01 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

कोरोनाचा करूया प्रतिकार

लॉकडाऊन झाली जनता
आली कोरोना महामारी.
लाखों लोकांचे गेले प्राणं
त्रस्त आहें दुनिया सारी.

"स्टे होम स्टे सेफ"
"सोशल डिस्टन्सिंग " हाच उपाय.
विनाकारण बाहेर फिरू नका
नाहीतर होईल कोरोनाचा अपाय.

पर्वा न करता जीवाची
डॉक्टर, नर्स, पोलीस झटतायत दिवसरात्र.
सौजन्यानें वागा त्यांच्याशी
कोरोनाच्या लढाईत तेच खरे मित्रं.

"गरीब',  "श्रीमंत' असा भेदभाव
करीत नाहीं कोरोना.
"मीच माझा रक्षक'
हाच मंत्र वाचवेल सर्वांना.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी
युद्धपातळीवर झटतय सरकार.
सरकारी नियमांचे पालन करून
कोरोनाचा करूया प्रतिकार.

– प्रशांत जैन
अंधेरी, मुंबई
M- 9321931008