तुझ्या गावचा पाऊस

Started by vishalrpawar, June 11, 2020, 03:22:51 PM

Previous topic - Next topic

vishalrpawar

तुझ्या गावचा पाऊस तेव्हा अवखळ होता,
मातीमध्ये तुझा अनोखा दरवळ होता,
उरला नाही तसा पाऊस, तशी माती;
नुसती आहे नभी ढगांची तळमळ आता.

तेव्हा पाऊस होता मनभर विसावलेला,
आता पाऊस आहे वनभर पिसाटलेला.

तेव्हा पाऊस अलगद होता,
आता पाऊस अवजड आहे.
तेव्हा पाऊस होता सोपा,
आता पाऊस अवघड आहे.

तेव्हा राणी तुझ्या सरीनी पाऊस होता सजलेला,
आता असतो पाऊस वेडा स्वतःमध्येच भिजलेला.
विशाल रा पवार