आठवण

Started by Prashant Jain, June 11, 2020, 03:47:28 PM

Previous topic - Next topic

Prashant Jain

आठवण

हृदयाच्या कप्प्यात केली
भूतकाळाची साठवण.....
शब्दात सांगायचे झालें तर
त्याला आपण म्हणतो आठवण......

गतकाळातील अनुभवातून
मिळते जगण्याची शिकवण......
स्वप्नांच्या दुनियेत रमणाऱ्या मनाला
वास्तवाची जाण करून देते ती आठवण......

कधी आनंद, कधी दुःख
संघर्षमय हे असे जीवन.....
अपयशाने खचलेल्या मनाला
उभारी देते ती आठवण......

परमोच्च आनंदाचे काही क्षण
जीवनाच्या पुस्कातील सोनेरी पान.....
आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणात
साथ देते ती आठवण......

प्रेमाच्या अन रक्ताच्या नात्याचे
कुण्या दूर गावी असतात आप्तजन.....
विरहाच्या दुःखात त्यांच्या
आधार देते ती आठवण....

आयुष्याच्या सागरात
होते सुखदुःखाची साठवण.....
शब्दात सांगायचे झालें तर
त्याला आपण म्हणतो आठवण......

-प्रशांत जैन,
शेवगांव,  अहमदनगर,
M - 9321931008