प्रेम शहाणं हव

Started by Shubhangi Gaikwad, June 22, 2020, 07:08:03 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

नको करू प्रेम वेड्यासारखा,आवर तुझ्या वेड्या भावनेला
नको करू अतिरेक भावनेचा, मुकशील प्रेमाच्या अस्तित्वाला

वाटते भिती प्रेमाच्या भरतीची, वाहुनी जाईन त्या महापूरात
असूदे प्रेम निर्झरा खळखळणारा,धुंद होईन त्याच्या संगीतात

भयभित करते तूफान प्रेमाच, होऊन जाईन मी त्यात उध्वस्त
असूदे प्रेम धुंद मंद वारा, जाईन शहारूनी त्या सुखद स्पर्शात

थरकाप करे आग प्रेमाची, वणवा होऊनी करेल मज भस्मसात
असूदे प्रेम समईतली ज्योत, जाईन न्हाऊनी त्या मंद प्रकाशात

थिजवी प्रेमाची अतिवृष्टी, होऊनी जलमय गुदमरेल जीव त्यात
असूदे प्रेम श्रावणी जलधारा, भिजुनी जाईन इंद्रधनुच्या रंगात

प्रेम असूदे स्पटिकासम नितळ, सप्त सूरांचं सुरेल गाणं
अविचारांचा स्पर्श न ज्याला ते बाळ निरागस गोड शहाणं

शुभांगी सुभाष गायकवाड
shubhgaik@gmail.com

Prashant Jain


Shubhangi Gaikwad

 धन्यवाद प्रशांत

vishal rpawar