पावसानं यावं नाही

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, June 25, 2020, 10:22:45 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.पावसानं यावं नाही*

कधी कधी आयुष्याची
रांगोळी सजवतांना
असाच पाऊस तिच्या माझ्या
जीवनात येऊन गेला
आज ज्याच्या त्याच्या मुखावर
फक्त आणि फक्त विषय प्रेमाचा होऊन गेला

पाऊस असाच उनाड
सैरभैर होऊन यायचा
मग कधी कधी काळजात थैमान घालायचा
तिची माझी भेट होईल
अन पुन्हा मिलनात समेट होईल
म्हणून मी ही वाट पाहत बसायचो
मनातल्या मनात हसायचो
कधी कधी नकळत रडायचो ही

आता येईलच ती
अशी गफलत शब्दांची व्हायची
ती नकळत समोरून ही जायची
पण नजरेने तिला टिपलं होतं
नजरचुकीने तिने ही मला पाहिलं होतं
असाच आमचा खेळ चालायचा
नेहमी तिच्या माझ्या प्रेमाचा मेळ छळायचा

पुन्हा पाऊस होईल
पुन्हा काळीच चिंब होईल
तिच्या चेहऱ्याचं पाण्यावर प्रतिबिंब होईल
ती अशीचं छळतं असते
ती काळजाला कळतं असते
पण वेळ निघून गेली की
वाट पाहणारी सांज ही ढळतं असते

आता वाटतं पावसानं यावं नाही
तिच्यासाठी गहाण रहावं नाही
कारण ती फक्त स्वप्नांत होती
अन माझ्या कफनात होती
आज गेलो आहे तिच्यामुळं मेलो आहे
फक्त पावसानं यावं नाही माझं व्हावं नाही
कारण सरण जळणार विझलं
अन पुन्हा आत्मा तिच्यासाठी झिजलं

✍🏻(कविराज. अमोल मीरा दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर