श्वासात अडकावं कसं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 07, 2020, 08:40:04 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.श्वासात अडकावं कसं*

श्वासात अडकावं कसं
श्वास मोकळा असतांना
आरसे खुणावतं असतात
नेहमी तू समोर नसतांना

डायऱ्या कित्येक भरल्या
शब्द वेचून वेचून लिहतांना
सुगंध दरवळत असेल ही
शब्द ओठांवर माळतांना

प्रश्न पडायचा आपली गट्टी
माझ्या कविता जुळवतील
तुझ्या माझ्या आशा दुराव्यात
पुन्हा नव्यानं भेटी घडवतील

असं डोळ्यात साचलेलं दुःख
तुझ्या ओढीनं संपलं नव्हतं
तू दूर का झालीस हा एक प्रश्न
अन त्याचं उत्तर मिळालं नव्हतं

या क्षणिक गोष्टी असतात म्हणून
प्रेमाला उपमा देणं टाळलं जातं
काळजातलं एक पान कोरं ठेऊन
मग उभं आयुष्य मौन पाळलं जातं

✍🏻(कविराज.अमोल).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर