श्रावणराज

Started by Shilpa Mohite, July 29, 2020, 09:37:43 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प १८ वे
          श्रावणराज

आला सणांचा श्रावण
झुले झाडांना टांगले
सासर -माहेरवाशिणींना
झाले आभाळ ठेंगणे

       झिम्मा-फुगड्यांचा खेळ
       मंगळागौरीचा जागर
       नववधू बावरते
       पाहून नात्यांचा बहर

व्रतवैकल्याचा श्रावण आला
घेऊन नागपंचमीचा सण
पुनवेची राखी बांधून
करी भाऊ बहिणीचे रक्षण

        आला जन्माष्टमीचा सोहळा
        जमला गोपाळांचा मेळा
        आनंदाची दहीहंडी फोडून
        साजरा झाला दहीकाला

गर्द हिरवळीला शोभे
केशरी उन्हाचा साज
लहानथोरांना हवाहवासा
सणांचा हा श्रावणराज
       
        - शिल्पा मोहिते