भारतरत्न... एक मागणी....

Started by Rushi.VilasRao, August 01, 2020, 05:31:14 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

आण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी साहित्य वर्गात अनेक महान काम करणारे अनेक लोक करीत आहेत त्यांना भारतरत्न का द्यावा किंवा ते या साठी कसे पत्र आहेत याच्या वर लक्ष देताना त्यांचा इतिहास देखील आपण पाहायला हवा तोच इतिहास मांडायचा हा छोटासा प्रयत्न.....
तुकाराम उर्फ आण्णा भाऊराव साठे यांचा जन्म सांगलीतील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी त्यावेळी गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या दलीत शोषित समजांपैकी एक असलेल्या मातंग समाजातील भाऊराव व वालुबाई साठे यांच्या घरी झाला....
तुकाराम शाळेत गेले असता तिथे सवर्णांमुळे होणाऱ्या अत्याचारा मुळे भेदभावा च्या वागणुकी  मुळे दीड दिवस शाळेत गेले व पुन्हा कधी त्यांनी शाळेचं तोंड पहायचं नाही अस ठरवल....
अतिशय लहान वयात त्यांची दोन लग्न झाली....
सुरुवातील तुकाराम हे डांगे यांच्या कम्युनिस्ट विचासरणीने प्रभावित होते...भारताला स्वतंत्र काळ आला स्वतंत्र काळात उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी ऑगस्ट १६ १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!"...
पुढे अनेक कामगिर्या , चळवळी झाल्या....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)

साठे यांनी साहित्य क्षेत्रात पाय ठेवण्यात बाबासाहेब आंबेडकर यांचा फार होता वाटा आहे अस म्हणाव लागेल कारण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत त्यांच्या विचारांपासून प्रभावित होवून दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. हे त्यांच्या साहित्य क्षेत्रातील पदार्पण होते...

भारतरत्न देण्याची सुरुवात राष्ट्रपती राजेंदरप्रसाद यांच्या कारकिर्दी च्या वेळेस झाली व मरणोत्तर हा पुरस्कार देण्याची सुरुवात १९५५ साली झाली....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
ज्यांनी कला, साहित्य, विज्ञान, समाज सेवा, खेळ या पाच क्षेत्रांच्या माध्यमातून केलेली असते त्यांना हा सर्वोच्च सन्मान दिला जातो आत्ता पर्यंत हा पुरस्कार ४८ लोकांना मिळालेला आहे २०२० हे साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त त्यांना भारतरत्न द्या अशी मागणी साहित्य क्षेत्रातून अनेक ठिकाणी होत आहे साठे स्वतः शाळेत गेले नसले तरी यांनी ३५ कादंबऱ्या १४ लोकनाट्य १३ कथासंग्रह १० पोवाडे अशा इत्यादी साहित्याची निर्मिती केली आहे त्यांचे साहित्य सत्तावीस देशांमध्ये सत्तावीस भाषांमध्ये प्रकाशित झालेले असून स्वतः साठे यांनी त्यांची कादंबरी चित्रा चे प्रकाशन रशिया येथे जाऊन केले होते साठे यांच्या साहित्यावर साहित्य क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी एम फिल आणि पीएचडी पदवी मिळवलेली आहे .... त्यांच्या सात कादंबऱ्यांवर सात चित्रपट निघालेले आहेत आणि विज्ञानवादी साहित्य निर्मिती करून समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.... त्यांनी हे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलित कष्टकरी कामगारांच्या यांच्या हातावर तरली आहे हा संदेश त्यांनी त्यांच्या विज्ञानवादी साहित्यातून जगाला दिला.....
त्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक मोलाचे योगदान होते रशिया या देशांमध्ये जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा म्हणला होता ...

साठे यांनी कला साहित्य विज्ञान सामाजिक सेवा खेळ या पाचही क्षेत्रांमध्ये खूप कामगिरी केलेली आहे या थोर साहित्यकांची जिवंत पणीच नव्हे तर मृत्युनंतर सुद्धा उपेक्षा का....????
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan