सगळं कळून सुद्धा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 02, 2020, 07:53:27 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.सगळं कळून सुद्धा*

तिच्या शिवाय बऱ्याच
दिवस एकटा जगलो
तिला पाहण्यासाठी
आयुष्यभर थांबलो
आता नका नेऊ असंच मला
सजवा मढे कोणीतरी येऊन माझे
कळलं आहे म्हणे तिचं
गावात पाऊल पडलं आहे
तिला कळलेच असेल
मी आता जगात नाही
आणि हो ते तसलं कापूस
वगैरे लगेच लावू नका
तिनं पाहिलं नसेल अजून मला
तिनं पाहिलं की न्या खुशाल
मग द्या वाट्टेल तेव्हडा अग्नीदाह.......

ती आता रडेल आक्रोश होईल
देवाला वाट्टेल ते दोष देईल
वाटलं होतं मेल्यावर तरी
स्वप्न माझं पूर्ण होईल
तिच्या जवळच थोडं सुख
माझ्या ओंजळीत येईल
पण असं झालंच नाही म्हणे
उलट हसत हसत ती आली
दोन शब्दांनी सांत्वन करून गेली
असं कसं झालं म्हणून....

सगळं कळून सुद्धा
तिनं सारं डोळे झाक केलं
उरल्या सुरल्या विश्वासावर पाणी फेरलं
गावभर चर्चेला उधाण आलं
जीच्यावर प्रेम केलं तिनंच परकं केलं
खूप सलत होती साऱ्यांची टोमणे
आत्मा ही प्रश्न करायचा
आता कशाला चर्चा करताय
मेलो तरी पुन्हा का मारताय
सारा दोष माझ्या माथी आला  होता
कारण तिनं मेल्यावर ही पुरस्कार दिला होता
एकतर्फी प्रेमाचा...

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर