आलोप

Started by swara, August 25, 2020, 08:05:05 PM

Previous topic - Next topic

swara

     कस वाटत असेल त्या व्यक्तीला जो प्रेमात अख्खा वाहून कोसळतो. अगदी गरजणाऱ्या ढगांसारखा. मला माहितीय माझी सुरुवात खूपच साधारण झालीय. पण आता सध्या मी ज्या स्तिथीत आहे या लिखाणात मला काहीच बदलायचं नाहीय . प्रेम हे इतकं खोलवरच असू शकत. माणूस त्याच्या शरीराने उपस्थितीत नसला तरी तो प्रत्येक नसात वाहू शकतो . डोक्यात, हृदयात, डोळ्यात, ओठात ,पूर्ण शरीरात ओसंडून वाहू शकतो. माझ्या शरीरात रक्त नाही प्रेम वाहतंय. माझ्या शरीरातून , माझ्या देहातून माझ्या आत्म्यातून इतका आवाज खळखळण्याचा आज मी पहिल्यांदा ऐकतेय,... श्वासात श्वास भिनलेत. हट्ट धरलाय हृदयाने... नाही परतणार पुन्हा कधीच. कदाचित शेवटची भेट आहे हि. कस शक्य आहे? २ आत्मा २ जीव .... शरीराने एकत्र नसले तरी तो इतक्या जवळ आहे. कदाचित शरीर इतक्या जवळ नाही येऊ शकत जितका हा सहवास आहे. डोळ्यामध्ये खूप लक्ख तेज .. १०००० तास बघून सुद्धा जीव सुखा राहतोय. पाणी अमृत मानलं जात पण मला त्याच्या श्वासातलं  अमृत हवय. नाक किती साधारण अवयव वाटायचा मला.  चंदन सुवासिक असेलही  पण या सुगंधाचा परिचय मी तुम्हाला कसा करून देऊ? इतकी दुर्मिळ संद्याकाळ मी आज अनुभवतेय. असा जीव ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. मला खात्री आहे त्याला पाहायला सुद्धा साधारण डोळे टाकाऊ वाटतील.  मी हात जोडून उभीय त्याच्यासमोर... हरलीय ... माझं सगळं त्याच आहे. मला असं वाटतंय कि त्याला पाहण्यासाठी माझ्या हृदयाला डोळे रचवावे लागतील.. दिव्य दृष्टी दाखवतील असे डोळे. आयुष्यात नाही पाहिलं असेल असं काहीस दाखवणारे डोळे.सुंदर, शांत, निखळ, स्वच्छ आणि मोहक दृश्य मी आजवर का पाहिलं नसावं. 

    माझे शब्द अपुरे पडतायत.. माझे डोळे बंद होतायत.. त्याचा चेहरा वास्तविकतेत जितका स्पष्ट नसेल त्याहून खूप जास्त लक्ख दिसतोय... मी नुसतं पाहतेय त्याच्याकडे. पण मी स्पर्श नाही करू शकत आहे. मी माझा स्वाताच अस्तित्व नाकारू शकते. फक्त त्या सहवासात यायला. आयुष्य....  काय आहे आयुष्य.  मी स्वतः अर्पण करायला तयार आहे. तू सांग मी काय असं करू कि तुला अस्तित्वात मी भेटेन. या नुसत्या मानातल्या दुनियेत किती वर्ष शोधात काढू .. मलापण तुझ्या दुनियेत घेऊन चल. मलापण एकदा मनातल्या जगातून बाहेर येऊन तुला सत्यात पाहायचय. बस्स इतकच कि हे सगळं तुला सांगू कस ते कळत नाही. कारण तुझ्याकडे ना मी पत्र पाठवू शकत ना मेल करू शकत ना फोन करू शकत. कोणता असा मार्ग या जगात नाही ज्याने हे सगळं तुला अस्तित्वात सांगेन. हि कोणती दुनिया दाखवलिया मला. मी फक्त तुझया विचारात दुनिया बघते. माझं अस्तित्व तुला देऊन मी अदृश्य झालीय....

    हे लिखाण शृंगारिक नाहीय असं मला वाटत. त्याहून पलीकडे एक सुंदर दुनिया आहे त्याचंच  हे वर्णन होत. मला तुझ्याकडून काहीच नकोय. निस्वार्थ प्रेम.. मला समजतंय सगळ.. मनाची इतकी दशा कधीच नव्हती झाली. मी खूप रमतेय  या प्रभावात , प्रहावात ... का तुझी खुशाली मी समजू नाही शकत?मी तरीही तुझ्या उत्तराची वाट पाहेन. कदाचित शेवटच्या श्वासानंतरही वाट पाहण थांबणार नाही. अशीच ओसंडून वारंवार, प्रेम करेन.

(कोणी हा अनुभव घेतलाय का आजवर? असेल तर please please मला ऐकायला खरंच आवडेल.)