मला माणसासारखं वागायचं आणि माणुस म्हणुन जगायचयं.

Started by Dnyaneshwar Musale, August 30, 2020, 11:43:07 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

मला माणसासारखं वागायचं
आणि माणुस म्हणुन जगायचयं.

चार चौकटीचा कडी कोंड्या
मी कधीच तोडुन टाकलायं,
चार चौघांतल्या बाजारी गप्पांचा हलकटपणा
मी कधीच मोडून टाकलायं
आता फक्त कोण नडतंय
ते बघायचयं.
कारण मला माणसासारखं वागायचं
आणि माणुस म्हणुन जगायचयं.

आता कुणाच्या तळपायाची आग
मस्तकात जात नाही,
इथे सारे गार पडलेत,
गरीब मात्र चटके खाऊन
पुरे पुर मोडलेत,
पुन्हा त्या पाणावलेल्या डोळ्यांना
हसवायचयं,
कारण मला माणसासारखं वागायचं
आणि माणुस म्हणुन जगायचयं.

ही माणसं आता माणसात बसत नाही
माणुसकीचा व्यवहार माणसात आता घुसत नाही,
रिक्त झाल्यात साऱ्या माणुसकीच्या जागा,
म्हणुन त्यात मला आता माणसं भरायच्यात
कारण मला माणसासारखं वागायचं
आणि माणुस म्हणुन जगायचयं.

कुणाच्या अश्रुंचं कोणालाच
काही घेणं देणं नाही,
बोटांवर नोटा ठेवल्याशिवाय
कुणाकडं जाणं नाही,
रस्त्यांवर काटे पुरणाऱ्यांनो
आता तरी माणसांत या हेच सांगायचयं,
कारण मला माणसासारखं वागायचं
आणि माणुसकीचं बियाणं माणसात पेरायचयं.