आत्मिक तृप्ती

Started by Deeksha, September 13, 2020, 06:31:20 PM

Previous topic - Next topic

Deeksha

एक म्हण आहे... या जन्मात जे कराल ते या जन्मातच फेडावे लागणार.माणुस आपल्या कर्मापासुन दुर पळुच शकत नाही.त्याचं कर्म त्याला शोधत येतच...मग ते वाईट असुदेत किंवा चांगलं..!!
   गीतेच्या एका श्लोकात ही म्हटलय की तु फक्त कर्म करत रहा ,फळाची अपेक्षा नको ठेवू. म्हणजे "तुझा फक्त कर्म करण्यावरच अधिकार आहे.. पण ते कर्म कसं करायचं आणी कोणतं (चांगलं की वाईट) हे तु ठरवायचं.आणी फळाची अपेक्षा नको ठेवु म्हणजे एकप्रकारे असं की फळ कधी मिळेल ..आणी चांगलं की वाईट मिळेल यावर ही तुझा अधिकार नाही ते कसं मिळेल(चांगलं की वाईट)  हे तु केलेल्या कर्मावर ठरेल.
माणुस क्षणभंगुर आयुष्य घेऊन जन्माला येतो आणी आयुष्यभर धावत राहतो सुखाच्या मागे... खुप धावुन पाहीजे ते सुख मिळालं तरी त्या सुखाचं समाधान भेटतं का??!! क्वचितच होत असेल तसं. समाधान म्हणजे काय तर "आत्मिक तृप्ती"असं मी म्हणेन. अशी  Stage की जिथे वाटतं बस सगळं मिळालय आपल्याला आता कसलीही अपेक्षा नाही.... अशी आत्मिक तृप्ती मिळालीय का कोणाला??!!ज्याची अपेक्षा आहे ते सगळं मिळालं..तरी ते तसचं टिकावं कायम अशी इच्छा राहतेच मनाला... ती कसली आत्मिक तृप्ती!!!?
जन्म आणी मृत्यु या दोन्ही गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या आहेत..माणुस मरण्यासाठी जगत असतो...फक्त प्रत्येकाची वेळ तेवढी वेगवेगळी असते..आणी हे त्रिकालबाधीत सत्य आहे जो जन्मला आहे तो एक दिवस मरणारच...आपल्या हातात असतं ते काय तर तो जन्म आणी मृत्यु या दरम्यानचा काळ...त्यालाच आपण आयुष्य म्हणतो. या मिळालेल्या आयुष्याला कसं सुंदर बनवायचं हे आपल्या हातात आहे..!आयुष्य सुंदर बनवणं म्हणजे ऐशोआरामाचं जीवन जगणं असं का!? तर नाही...आयुष्य सुंदर..सुखी आणी समाधानी बनवणं म्हणजे ती आत्मिक तृप्ती शोधणं!आणी ती आत्मिक तृप्ती चांगले कर्म केल्यानेच मिळेल असं मला वाटतं..! चांगल्या आणी वाईट कर्माचा परिणाम आपल्या आयुष्यावर नकळत का होईना पण होतच असतो. आपल्याला आजूबाजूला अशी भरपुर उदाहरणे पहायला मिळतील.जे लोक वाईट काम करतात अशा लोकांना मानसिक सुख आणी शांतता कधीच मिळत नाही आणी काही व्यक्ती असेही बघायला मिळतात जे सुखी असल्याचा देखावा तर जरुर करतात पण आतुन खुप खचलेले असतात..हे त्यांच वाईट कर्म च असतं जे त्यांना कुठल्या न कुठल्या मार्गाने याच जन्मात भोगावं लागतं.. ! चांगलं कर्म पेरलं तर त्याचं फळ ही चांगलच मिळणार आणी वाईट कर्म केल तर त्याच फळ ही वाईटच मिळणार
चांगल्या कर्माच फळ जरी आत्ता मिळाल नाही तरी ते कधीना कधी मिळेल हे नक्की. पण ते कर्म करताना जे सुख मिळतं ते कदाचित त्या फळापेक्षा गोड असतं असं मी म्हणेन... आणी हीच ती आत्मिक तृप्ती जी चांगल्या कर्माने मिळते. माणसाने अशा आत्मिक तृप्ती च्या शोधात जगावं..सद्कर्मांच्या शोधात जगावं.. आणी मिळालीच संधी सद्कर्म करायची तर ती कधी न सोडावी..कारण माणुस शरिराने जरी मेला... पण त्याचं कर्म जर चांगलं असेल तर तो अमरत्व प्राप्त करतो.



                    -दिक्षा गावित😊