रोगाचं थैमान (कोरोना)

Started by yallappa.kokane, September 19, 2020, 05:07:45 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

रोगाचं थैमान

थैमान मांडलंय रोगानं
बंद झाली देवाची दारं
डाॅक्टर, पोलिस देव ठरले
वाचवत आहे जग सारं

नाही करत स्वतःची चिंता
लढा सुरूच आहे रोगाशी
माणसातला डाॅक्टर, पोलिस
नेहमी खेळ खेळे जीवाशी

अरे माणासा, शहाणा हो
हिताचे आहे घरात बसणे
नाहीतर खूप मुश्किल आहे
तुझे तुला माणसांत दिसणे


यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ एप्रिल २०२०
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर