यावे पुन्हा भूमंडळी राजे!

Started by sachinikam, September 19, 2020, 08:40:51 PM

Previous topic - Next topic

sachinikam

यावे पुन्हा भूमंडळी राजे!

(पुस्तक: मुक्तस्पंदन, कवी: सचिन निकम)

हे हिंदवी स्वराज्य संस्थापिले तुम्ही
शतकोटी नमन आहोत ऋणी आम्ही
समृद्ध संपन्न राष्ट्र महान आपुले
ऐशा पावन भूवरी सौख्य आम्हांसी लाभले
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
दीपस्तंभापरी मार्गदर्शया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।। धृ . ।।

कित्येक दशके उलटली, आक्रमणे परक्यांची झाली
मतलबी राज्यकर्त्यांनी अस्मिता गंगेस वाहिली
घुसला भ्रष्टाचार अंगी, पिळती रयतेचा कान
निर्लज्जापरी दिल्लीमध्ये अजूनी झुकवती मान
स्वाभिमान जागृताया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।।१।।

जाहले व्यक्तीस्वातंत्र्य स्मशान
पेटले ऐसे लोकशाहीचे रान
बुजलेले ते नेते कसले
श्रेष्टींच्या आदेशाला जे समजती शान
विकासाच्या आराखड्यात भरती स्वतःचीच तिजोरी
सामान्यांच्या नशिबी मात्र शिळी शिदोरी
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
कडेलोट बुजगावण्यांना ठोठवाया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।।२।।

म्लेंच्छांनी माजविला अतिरेक
बळी पडती निष्पाप कित्येक
देखते निमूट, हतबल सरकार खेळ
कोणजाणे कुठे चुके गुप्तहेरांचा मेळ
शक्तीपरी युक्ती वापराया
गनिमी कावा आम्हा शिकवाया
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
दुष्ट प्रवृत्तींना ठेचाया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।।३।।

घुमतोय नाद हर हर महादेव सह्याद्रीतून
गरजतोय प्रतिसाद जय भवानी अंतरातून
फडकतोय दिमाखात भगवा रायगडावरी
पाहतोय वाट झाला आतुर भेटण्या गड शिवनेरी
आहे आग्रहाचे निमंत्रण माझे
मराठा तितुका मेळवाया...
यावे पुन्हा भूमंडळी राजे ।।४।।

Copyrights: Skrinz Studios

sachinikam

जाहले व्यक्तीस्वातंत्र्य स्मशान
पेटले ऐसे लोकशाहीचे रान
बुजलेले ते नेते कसले
श्रेष्टींच्या आदेशाला जे समजती शान

sachinikam

Watch the full video on YouTube Channel "Skrinz Studios Music".