ऐसा मी मराठा

Started by sachinikam, September 19, 2020, 08:50:34 PM

Previous topic - Next topic

sachinikam

ऐसा मी मराठा

(पुस्तक: मुक्तस्पंदन, कवी: सचिन निकम)
(या कवितेत "मराठा" हा शब्द जातीवाचक न घेता गुणवाचक घ्यावा)

मोडेन पण वाकणार नाही
संपलो बेहत्तर झुकणार नाही
स्वाभिमानी बाणेदार
स्वावलंबी इमानदार
बलभीम यष्टी पीळदार
मस्तकी युक्तींचा साठा
ऐसा मी मराठा.

शौर्य मनगटात माझ्या, हृदयी दयेचा ठोका
मन धीट माझे, कणखर माझा मणका
चित्तथरारक कर्तबगारीने
काढतो गनिमांचा काटा
ऐसा मी मराठा.

मायभूमीच्या रक्षणासाठी, मायबोलीच्या जतनासाठी
लावतो प्राण पणाला
भगव्याचा मी सच्चा भक्त
सळसळते धमन्यांत युवा रक्त
चिरुनी समुद्राच्या लाटा
जिंकतो साऱ्या बिकट वाटा
ऐसा मी मराठा.

वारकरी भजतो विठोबाचा
मावळा लढतो शिवबाचा
अंतरी नांदते सदा
ज्ञानेश्वरी अन गाथा
ऐसा मी मराठा.

Copyrights: Skrinz Studios