तूर्तास दुःख माझे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, October 02, 2020, 10:52:17 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तूर्तास दुःख माझे*

उंच भरारी घेणारे पंख तू जरी छाटले होते
पुन्हा प्रेम करावे नव्याने असे वाटले होते

तूर्तास दुःख माझे सांगू कुणाला आता मी
भग्न काळजात या हुंदके जरी साठले होते

मागणे नव्हते काहीच प्रिये तुझ्याकडे माझे
सुखाचे आभाळ आज हे जरी फाटले होते

जपलं तुला मी काळजाच्या तुकड्या सारखं
विरहाचे धुके डोळ्यासमोर जरी दाटले होते

तुला नकोसा होतो मी सांगितले असते आधी
वाट सोडली असती मृत्यू ने जरी गाठले होते

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील.)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर