अंतरीचा प्रवास हा.........

Started by sneha31, October 13, 2020, 10:14:13 AM

Previous topic - Next topic

sneha31


हातातील वाळू प्रमाणे आयुष्यही सुटत जातं
आकाशातील वादळ प्रमाणे मन सुद्धा कुठे तरी हरवत जातं
कधीतरी सोपी वाटणार आयुष्य खूप अवघड होत जातं
शब्दांची जुळवाजुळव करत अंतरीचा प्रवास सुरू होत जातं

लहानपणी कळत नसत टेन्शन म्हणजे काय असतं
आणि मोठे होताच सुखं दुःखाचे डावपेच सुरू होत
मोबाईल चा दुनियेत व्यस्त होऊन सगळी नाती संपत जातात
म्हणूनच मनातल्या गोष्टी मनात च राहून जातात

आपलेच जेव्हा आपल्याला दुखावतात
तेव्हा कुठेतरी गुलाबाचे काटेही हृदयाला टोचतात
सत्या पेक्षा आजकाल खोट्याला महत्व दिलं जातं
इथे कुणीच कोणाचं ऐकायला तयार नसतं
म्हणूनच मन अातल्या आत कुठेतरी करपत जातं

खूप प्रयत्न केल जात मनाला समजावण्याच
समुद्रासारखं मन मोठं होऊन जगण्याचं
पण कितीही केलं ते मनुष्यच च मन असत
त्यालाही कुठेतरी कुणीतरी समजून घेणार हवं असत
म्हणूनच मनातल्या मनात अंतरीचा प्रवास हा सुरूच असतो

ajay81

hi sneha changl lihil aahes. kavita hey tumach pratibimb asate ase mhantat. ha tuza antaricha prawas fakt dukhad n rahata aanadamayee whawa  hi sadichha


regards
ajay