एकांत....

Started by Vinayak Patil, October 15, 2020, 03:33:29 PM

Previous topic - Next topic

Vinayak Patil

दुनियेच्या गर्दीत स्वताला शोधण्यात मी गर्क
मग या 'स्व' साठी लावलेले तर्क - वितर्क
स्वप्नातल्या स्वप्नांचा झालेला अंत
मी आणि माझा एकांत 😊

गेलेले क्षण आणि येणारी वेळ
दोघांचा न जुळणारा मेळ
विचारांचा चालतो असाच खेळ
हा लपंडाव बघण्यात रमुन जाते ही सांजवेळ
अबोल ही निशा वारा हा शांत
शेवटी उरतो तो बस, मी आणि माझा एकांत. 😊