असचं येता-जाता

Started by vpbarde, October 21, 2020, 11:47:33 AM

Previous topic - Next topic

vpbarde

सकाळची वेळ.. मी थोडी घाईतच होते.. रिक्षातुन उतरले आणि थोडी पुढे जाते न जाते तोच ती दिसली.. ती माझ्या ओळखीची नव्हती.. पण का कुणास ठावुक तीला कुठे तरी बघितलेले वाटले.. आणि न कळतं आमचे बोलणे पण सुरु झाले.. ती नुकतीच सुटीमध्ये कुठल्यातरी नातेवाईकाकडे राहुन परत आपल्या घरी जात होती..
     कॉलेज.. अभ्यास.. करियर.. या बदल ती भरभरुन बोलत होती.. काही जणांना ओळख वगैरे नाही लागतं.. जुजबी ओळख झाल्यावर काहीजण भरभरुन बोलायला लागतात.. शिष्टाचार वगैरे त्यांच्या ध्यानी-मनी ही नसंतो.. ती कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी त्यापैकीच एक होती.. फारशी ओळख नसलेली आणि अगदीच अनोळखी नसलेली ती मुलगी अखंड बडबडत होती.. खरं तरं तिचा ओसंडुन जाणारा उत्साह बघुन मलाही उत्साही वाटत होते.. आणि हो तिनी बोलंता-बोलता तिची अशी एक प्रेमकहाणी सुध्दा सांगितली.. तीची प्रेमकहाणी थोडक्याच अशी..
     एक मुलगा तिला खुप आवडतो. तो तिच्याच कॉलेजमध्ये शिकतोय.. खुप हुशार आणि बुध्दिमान आहे तो.. पण तिनी अजुन तिच्या भावना त्या मुलाला सांगितलेल्या नाहीत.. आणि ती कधी सांगणार पण नाही.. कारण तिला ते योग्य वाटंत नाही.. ती म्हणते तो हुशार.. बुध्दिमान.. मी अशी साधारण पेक्षाही साधारण.. कुठेच आणि कुठलाच ताळमेळ नाही.. My Feelings are only for My Feel-Good Touch.. That's all..
     ओ.के.. त्या मुलीची कहाणी ऐकुन मला संत मिरा आठवली.. कसलीही अपेक्षा न ठेवता त्या सावळया-सुंदर-श्यामसुंदर वर मनापासुन प्रेम करणारी मिरा.. ती मुलगी सुध्दा खुप साधी-सरळ आणि मनाने निर्मळ वाटली.. खुप उशीर झाला होता.. आम्ही दोघीही पुन्हा असेच केव्हातरी भेटुयात असे ठरवुन आप-आपल्या वाटेने निघालो.. पण् आज मला मात्र नविनच शोध लागला.. इतकं सगळं सहन करुनही मिरा सुखी का ? याचे उत्तर ती कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी देऊन गेली.. (संत मिरा या व्यक्तीरेखे विषयी अभ्यास करावा तेव्हढा थोडाच आहे.. या व्यक्तीमत्वाने मला खुप काही शिकविले आहे..)
       कमकुवत पंख घेवुन आकाशात उंच उडण्याचे स्वप्न नाही बघता येत.. पण मी मात्र माझया कल्पनेच्या आकाशात रोज एक नविन स्वप्न बघत असते.. माझया जगण्याचा एकमेव आधार आहे माझया कल्पनेतलं आकाश.. कदाचित त्या मुलीचंही असंच काहीसं स्वप्न असेल.. तिच्या जगण्याचा आधार असलेलं स्वप्न..     
    चला.. करोनाचा हाहाकार.. सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येचे वाढते राजकारण.. सामान्य माणसांची रोज वाढणारी तारांबळ.. बेरोजगारी.. शिक्षणाचा ऑनलाईन गोंधळ.. अजुन बरेच काही.. या सगळयातनं सावरण्याची धडपड करणारा माणुस खरोखर शुरविर आणि धैर्यवान आहे.. उदयाचा दिवस चांगले काहीतरी घेवुन येईल याच एकमेव आशेवर रोजचे आयुष्य जगणारा सामान्य माणसाला त्रिवार वंदन..
    सध्या सकाळ संध्याकाळ करोना आणि करोना.. दुसरा कोणताच विषय सुचत नाही.. लहान मुलांपासुन वयोवृध्द माणसांपर्यंत बोलण्यात करोना हाच विषय असतो.. बेकारी आणि गरिबी हे दोन भावंडही हातात हात घालुन मोकळेपणी फिरत आहेत.. पण आपण हिम्मत हारुन चालणार नाही.. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करुन आपण केलेल्या संघर्षाचा आदर्श पुढच्या पिढिसमोर ठेवणार आहोत.. 
    आजचा सकाळचा चहा एक प्रकारचं हळवेपण घेऊन आला.. अचानक भेटलेली ती अनोळखी मुलगी.. तिची ती आगळी-वेगळी पण कुठतरी माझया अगदी ओळखीची ती प्रेमकथा.. निरखुन-पारखुन नफा-तोटयाचे हिशोबी आणि व्यावहारिक प्रेम करणारे गल्लोगल्ली सापडतील.. पण त्या सावळया-सुंदर-श्यामसुदरच्या मुर्तीवर भक्तीमय प्रेम करणारी मिरा एकच.. आणि म्हणुनच पहाटेचा चहा मलाही सांगत होता.. 
                                         जब बेवजह इल्जाम लग जाये.. तो क्या किजिए..
                                         फिर यॅु किजिये.. वो गुनाह कर ही लिजिए..