राजकारण

Started by vpbarde, October 21, 2020, 11:52:26 AM

Previous topic - Next topic

vpbarde

बॉलिवुड.. राजकारण या क्षेत्रातला सावळा गोंधळ बघुन झाला... करोना महामारीचा जगभर चाललेला थैमान बघणं चालुच आहे.. शिक्षण क्षेत्रात डोकावुन बघितलं तर तिथही सगळीजणं गोधंळलेलीच आहेत.. वैदयकिय क्षेत्रातही नुसती धावपळच सुरु आहे... करोनावरची लस तयार करण्यासाठी डॉक्टर मंडळी रात्रं-दिवस झटुन काम करतं आहेत.. या सगळयांची कमतरता म्हणुन कि काय अतिवृष्टी मुळे शेतकरी हैराण आहे.. यातुन माणसाने कधी आणि कसे सावरायचे हा एक चिंतेचाच विषय आहे..
     असो.. चारी बाजुने फक्त संकटच दिसत असतानां यातुन मार्ग काढणे आणि जगणे आणि जगविणे हेच तर माणसाचे खरे कौशल्य.. चला बाकीच्या गोष्टी थोडं बाजुला ठेवुयात.. एक मुदृा इथे सांगावासा वाटतो.. खरं तर राजकारणात मला रस नाही.. त्यातले मला काही कळतं नाही.. त्यावर बोलण्याचा मला हक्कही नाही. पण आजची परिस्थिती बघता एक सांगावेसे वाटते.. आज प्रत्येक क्षेत्रात करिअर करायचे असल्यास स्पर्धा परिक्षेला पर्याय नसतो... पोलिस भरती.. मिलिट्री भरती.. नेव्ही.. मेडिकल.. शिक्षण.. एअर फोर्स.. आणि अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे स्पर्धा परिक्षेत यशस्वी झाल्यावरच त्या-त्या आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी मिळते.. पण राजकारण याला अपवाद आहे.. मंत्रीपद मिळवायला कोणतीही स्पर्धा परिक्षा नाही आणि शिक्षणाची अट नाही.. जनमानसात.. सामान्य माणसांमध्ये थोडीशी चमचेगिरी... लालुच.. थोडीशी धाकदपटशाही आणि दादागिरी केली म्हणजे कोणीही मंत्रीपद मिळवुन मुन्नादादा किंवा मुन्नाभाई म्हणुन व्हाईट कॉलरनी मिरवायला मोकळा... पण माफ करा हे योग्य आहे का... थोडा आपला दृष्टिकोण बदलुन गंभिरतेने याचा विचार करायलाच हवा... मंत्रीपद मिळविण्यासाठी त्या क्षेत्रात आधी स्पर्धा परिक्षा देणे महत्वाचे.. मग जनमत मिळविणे...
      कल्पना थोडी अवघड आणि न रुचणारी आहे पण राजकारणात निर्मळ पारदर्शकता हवी असेल तर काहीशी अशी परिक्षा घेणे आवश्यक आहे.. आणि वर्षभरासाठी राजकारणात प्रायोगिक तत्वावर काम करुन स्वता:मधली त्या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी क्षमता सिध्द झाल्यावरच कायमस्वरुपी मंत्रीपदावर रुजु करुन घेण्याचा नियम लागु करण्यात यावा.. (वैदयकिय क्षेत्रातही डॉक्टरांना सुरुवातीला सहा महिने Internship करावी लागते..) प्रत्येक क्षेत्रात काळाप्रमाणे बदल हे होतच असतात. मग या क्षेत्रात काळाप्रमाणे बदल का नको.. सकारात्मक दृष्टिकोण ठेवुन यावर विचार करायला काय हरकत आहे.. तरं मग लागा अभ्यासाला... तयार आहात ना ... All the best.. (( मी मात्र या क्षेत्रातली ढ विदयार्थिनी आहे.. नापास..))... यार.. इथे बॉलिवुड मध्ये येण्यासाठी सुदधा कलाकाराला आधी ॲक्टिंग स्कुलमध्ये जावे लागते... पण कलाकारांचा रंगमंच वेगळा... आणि मंत्रिपदावर बसुन देशाचा रंगमंच चालवणे वेगळे.. कलाकाराची जबाबदारी वेगळी.. मंत्रीपदाची जबाबदारी वेगळी.. पण दोघांनाही जनमानसा समोर अगोदर स्वता:ला सिध्द करुन दाखवावेच लागते... थोडक्यात काय तर ही दुनियादारी चमत्काराला नमस्कार करणारी आहे...
      माफ करा.. हे सगळं रोखठोक आहे... पण समाजामध्ये सकारात्मक बदल घडवुन आणायचा असेल तरं थोडा बदल आवश्यक आहे... माणुस आजारी पडल्यावर नाईलाजाने कडु ओैषध घेतोच त्या शिवाय त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही.. मग येणा-या पिढीसाठी हा बदल स्विकारणार ना...

!!  सत्यमेव जयते !!