One Thought

Started by vpbarde, December 01, 2020, 05:12:25 PM

Previous topic - Next topic

vpbarde

  कल्पनेच्या विश्वात रमणे किती आल्हाददायक आणि सुंदर असते ना ? पण वास्तविक आयुष्यात हारणे-जिंकणे.. यशस्वी-अपयशी.. हुशार-नालायक.. पहिला-दुसरा.. सुंदर-कुरुप.. गरिब-श्रीमंत.. मान-अपमान.. अश्या कितीतरी व्याख्यांमध्ये माणसांना अडकविले जाते.. पण खरंच या व्याख्यांपलिकडचे जगणे नसतेच का ?? मी तरं नेहमीच या सगळया व्याख्यामध्ये स्वत:ला गुंतुन न ठेवता मुक्तपणे जगण्याचा आणि मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करंत असते.. मला तरं नेहमी या सगळयांच्या पलीकडे एक सुंदर जग असावे असेच वाटतं असते.. अरे आपण तारे जमीन पर... 3 इडियट अश्या मुव्हीज चवीने बघतो... त्यावर चर्चा करतो.. मग रोजच्या आयुष्यात भेटणा-या प्रत्येक व्यक्तीचे.. प्रत्येक विदयार्थाचे असे वेग-वेगवेगळे मुल्यमापन करुन त्यावर वेग-वेगळे शिक्के मारण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला... एक व्यक्ती म्हणुन प्रत्येकजण खासच आहे.. प्रत्येकामध्ये काहीतरी खासीयत असतेच असते... मध्यंतरी मी सुशांतसिंग राजपुतचा छिछोरे बघितला... या मुव्हीची मुळ कल्पनाच हि होती की हारणे-जिंकणे.. यशस्वी-अपयशी.. या सगळयांच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणुन जगत असताना प्रत्येकाचा एक मोलाचा वाटा असतोच.. प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ठ असतेच.. असो... इथे चंद्रावरही डाग शोधणारे असतातच... पण कोळश्याच्या खाणीत काम करत असताना हात काळे झाल्याशिवाय चकाकणारा हिरा हाती लागत नाही हे ही तितकेच खरे... इथे जगणा-या प्रत्येक व्यक्तीत काहीतरी गुण वैशिष्ठ असतेच पण ती शोधक नजर हवी.. सहनशक्ती हवी आणि त्या-त्या व्यक्तीला समजुन घेण्याची क्षमता आणि धिर हवा...
       पण एक सांगु.. इथे माणुस जिवंत असेपर्यत त्याची कोणाला कदर नसतेच.. त्याच्यातले चांगले गुण कोणालाच दिसतच नाहीत.. काहींच्या वाटयाला फक्त निंदाच येते आणि मग ती व्यक्ती तिच्यात असणारे विषेश गुण पण विसरुन जाते आणि एक चकाकणारा हिरा नजरेआड होतो.. पण तो हया मैफिलीतनं गेल्यावर मात्र त्याचे गुण-गाण सुरु होते.. यार हिच तर दुनियादारी आहे...
       म्हणुनच आमच्यासारखे काहीजणं कल्पनेच्या दुनियेतच सुख-दुखाच्या पलीकडचं आयुष्य जगतं असतात.. नको ते जिंकण-हारणं.. नको ते यश-अपयश.. नको ती गरिबी-श्रीमंती.. हया कल्पनेच्या विश्वात माझी अशी एक ओळख आहे.. माझं असं एक आकाश आहे..  समाधानी आयुष्य जगण्यासाठी अजुन काय हवंय.... हो..ना.. आकाश.. Sky is the limit for me..
    एक विचारु.. झाडावर सरसर चढणारी खारुताई बघितली आहे.. आपल्याच नादात.. आपल्याच मस्तीत मस्तपैकी इकडुन तिथे पळणारी खारुताई मला खुप आवडती... कोणाशी हेवे-देवे नाही.. कोणाशी यारी-दुश्मनी नाही.  तिचे विश्वच वेगळे असते.. असे मनसोक्त जगताना सगळयांना आपल्यात सामावुन घेण्याची कला माणुस कधी शिकणार....



खारीचा वाटा.. मोलाचा मोठा