मराठी कविता आणि मी

Started by Anil S.Raut, December 14, 2020, 12:18:04 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

मराठी कविता आणि मी

     साधारण १९९७ पासुन मी साहित्य क्षेत्रात आलो.शाळेत गणित व इंग्लिश हे माझ्या आवडीचे विषय.मराठी व हिंदी हे विषय आणि त्यातल्या त्यात पद्य (काव्य ) विभाग तर अगदीच नावडीचा.कोणत्याही कवितेचे एक कडवेदेखील कधी पाठ नसायचे.पण आयुष्य जिकडे नेईल तिकडे वाहत राहिलो व मी चक्क कविता लिहू लागलो आणि मी कवी,लेखक झालो.साप्ताहिके,मासिके,दैनिकाच्या रविवार पुरवणी यामधून त्या छापून ही यायला लागल्या.कवितेबरोबरच कथा,लेख लिहीणेही ओघाने आलेच.अशातच एक प्रयत्न म्हणून दोन बातम्या लिहून नुकत्याच सुरु झालेल्या एका साप्ताहिकाकडे पाठवून दिल्या.त्या दोन्ही बातम्या छापल्या गेल्या आणि मी पत्रकार झालो.पुढे त्याच साप्ताहिकाचा व्यवस्थापकिय संपादकही झालो.आयुष्य वाहत होते..मी त्याबरोबर वाहत होतो....आणि साधारण 2012-13 ला गावखेड्यात मोबाईल व इंटरनेट आले.मग माझी मराठी कविता या अॅपशी ओळख झाली.त्यावर मी माझ्या कविता पोस्ट करु लागलो व असंख्य वाचकांपर्यंत पोहोचू शकलो.अनेक नवे मित्र व नवे चाहते या माध्यमातून मला मिळाले.
    अशातच मराठी कवितावरील माझ्या कविता वाचून 2014 च्या सप्टेंबर मध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून एक कॉल आला.मला आकाश ठेंगणे झाले.कारण त्या व्यक्तीला एका फिल्मसाठी गाणी लिहून हवी होती.कविता लिहीणे आणि गाणी लिहीणे यात खूप फरक आहे.मी याआधी कधी गाणी लिहीली नव्हती.तसा एकदा प्रयत्न करुन बघितला होता पण हा आपला प्रांत नोहे असे म्हणून तो नाद सोडून दिला.आता चक्क इंडस्ट्रीतून कॉल आला म्हणल्यावर मी परत एकदा प्रयत्न करुन बघायचे ठरवले व मी गाणी लिहू शकलो.पूढे त्या गाण्यांचे व त्या फिल्मचे काहीच झाले नाही हा भाग अलहिदा!
   पण त्या व्यक्तीमुळे माझा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला व संजयराज गौरीनंदन सरांसारख्या संगीतकाराची आणि अजित देवळे सरांसारख्या दिग्दर्शकाची ओळख झाली.पुढे या ओळखीचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले.
    संजयराज गौरीनंदन सरांनी माझ्या हिंदी मराठी भक्तीगीतांना संगीत देऊन ती युट्यूबच्या माध्यमातून जगभरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि मी गीतकार झालो.
    दिग्दर्शक अजित देवळे सरांनी मला चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद कसे लिहायचे ते शिकवले.यातूनच मी अजित देवळे दिग्दर्शित 'मसुटा' या चित्रपटाचे संवादलेखन करु शकलो.6 अॉगस्ट 2020 ला हा मसुटा चित्रपट एमएक्स प्लेअरवर रिलीज झाला आणि मी चित्रपट लेखक झालो.
    याशिवाय हेमंतकुमार महाले सर निर्मित,दिग्दर्शित 'काळी माती' या फिल्म साठीही मी संवादलेखन केलेले असून ही फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.सध्या  ही फिल्म जगभरातील फेस्टीवलसाठी पाठवली जात आहे.
    तसेच प्रेमांतर या फिल्मसाठी पटकथा-संवाद,फ्रेंड रिक्वेस्ट व मन बावरे साठी गाणी,जिगरी साठी प्रपोजकाव्य असा माझा चित्रपट प्रवास सुरु आहे.
2014 ते 2020 हा काळ काही फार मोठा नाही.फक्त सहा वर्षांचा काळ.पण या सहा वर्षांनी मला खूप काही दिले.
  अगदी सुरुवातीपासुन विचार केला तर चित्रपटसृष्टीतील या माझ्या प्रवासातील मुळाशी जर कोणी असेल तर ते म्हणजे 'मराठी कविता'!
....आणि म्हणूनच माझ्या हृदयात 'मराठी कविते' चे स्थान अगदी श्वासासारखे आहे.
....'मराठी कविता'- तुझे लाख लाख आभार!

                  © अनिल एस.राऊत
                 8999689958
टीप : आदरणिय अॅडमिन यांचे मागणीनुसार माझ्या रिलीज झालेल्या प्रोजेक्ट ्सच्या लिंक खाली देत आहे.मी अॅडमीन यांचा पुनश्च आभारी आहे.
|| ॐ गं गणपतये नमो नमः ||
   
     माझी गणेशभक्ती

लेबल :- T-Series
बोल :- श्री गजानन
स्वर :- महेश राव
संगीत :- संजयराज गौरीनंदन ( SRG )
गीत :- अनिल एस.राऊत
https://youtu.be/nVWHSzXtCm4
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

लेबल :- T-Series
बोल :- अष्टम स्थाने
स्वर :- डॉ.प्रसन्न म्हैसाळकर
संगीत :- संजयराज गौरीनंदन ( SRG )
गीत :- अनिल एस.राऊत
https://youtu.be/ap3OZO6HoIo
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

लेबल :- Wings
बोल :- अगाध तेरी महिमा देवा
स्वर :- एल.नितेशकुमार
संगीत :- संजयराज गौरीनंदन ( SRG )
गीत :- अनिल एस.राऊत
https://youtu.be/0EcWLnYAsYo
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
लेबल :- Worldwide
बोल :- नमो नमो शिवसुता
स्वर :- चंद्रानी मुखर्जी ज्यूनिअर
संगीत :- संजयराज गौरीनंदन ( SRG )
गीत :- अनिल एस.राऊत
https://youtu.be/sms8gNu7xjo
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

माझी कृष्णभक्ती

लेबल :- 9 Swastik
बोल :- कृष्णकन्हैया तेरे नाम की
स्वर :- निहारिका सिन्हा
संगीत :- संजयराज गौरीनंदन ( SRG )
गीत :- अनिल एस.राऊत
https://youtu.be/hpliI4tw6VI
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

माझी साईभक्ती

लेबल :- Anuja
बोल :- तेरी भक्ती मे
स्वर :- अनुप जलोटा व चंद्रानी मुखर्जी ज्यूनिअर
संगीत :- संजयराज गौरीनंदन ( SRG )
गीत :- अनिल एस.राऊत
https://youtu.be/OUi7a0xd_eE
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

लेबल :- GoBindas
बोल :- साई मेरे मन के मंदिर मे
स्वर :- बेला सुलाखे
संगीत :- संजयराज गौरीनंदन
गीत :- अनिल एस.राऊत
https://youtu.be/BTaOcmVbeBY
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

          माझी माता भक्ती

लेबल :- T Series
बोल :- अंबे
स्वर :- एल.नितेशकुमार
संगीत :- संजयराज गौरीनंदन
गीत :- अनिल एस.राऊत
https://youtu.be/mNVsCTioRcU
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
           मराठी चित्रपट - मसुटा
निर्माता :- भरत मोरे
दिग्दर्शक :- अजित देवळे
संवाद :- अनिल एस.राऊत

https://www.mxplayer.in/movie/watch-masuta-movie-online-ac4295019b64f6d75771e3f9b7bdac4e?utm_source=mx_android_share
____________________________

MK ADMIN

Tumchya ganyachya YouTube links aahet ka ? Astil tar krupaya post kara