निशब्द प्रेमं

Started by Prashant Jain, December 19, 2020, 09:49:52 AM

Previous topic - Next topic

Prashant Jain

     निशब्द प्रेमं

वीस वर्षानंतर भेटलो आपण
भूतकाळ उभा समोर अचानक
तुझ्यापण आणि माझ्यापण..... .

तुही शांत मीही शांत
ओठ स्तब्ध डोळे बोलले.......
भूतकाळातले प्रेमं
क्षणांसाठी फुलले.......

काय बोलावे तुलाही कळेना
बोलण्यासाठी मलाही शब्द मिळेना
दोघेही क्षणांसाठी थोडे हसलो
पसरला एकांत निवांत बसलो

अनेक प्रश्न आले मनात
का गेली मला सोडून.....
निष्पाप आपले प्रेमं
एका क्षणात तोडून.....

तिची अवस्था
तिचे डोळे सांगून गेले.....
आता अर्थ नव्हता विचारायला
तु असे का केले? ......

मी शांत होतो
ती बोलत राहिली.....
वीस वर्षांपूर्वीची निरागसता
तिच्यात मी परत पाहिली....

तिच्या बोलण्यातून
भूतकाळातले प्रेमं जाणवत होते......
पण ती राहिली नाही आपली आता
हे वर्तमानकाळातले क्षण खुणवत होते.......

-प्रशांत प्रकाश घोडके
शेवगांव, अहमदनगर
-M- 9321931008
-prashant851@gmail.com