चला करू नवीन वर्षाचे स्वागत

Started by ankushlatkar, December 26, 2020, 08:58:58 PM

Previous topic - Next topic

ankushlatkar

होळी झाली,चतुर्थी झाली,झाली दिवाळी |
आता नवीन वर्षाच्या स्वागताची पाळी ||

जावो सर्वांना नवीन वर्ष हे गोड |
वाईट सावयींना द्या तुम्ही सोड ||
थांबवा शिकार आणि वृक्षतोड |
लावा चांगल्या सवयींची ओढ ||

उठा लवकर करा व्यायाम |
नका करू सतत आराम ||
करा मेहनत सुबह से शाम |
बोला जय राम जय श्रीराम ||

संपले २०२० आणि २०२१ झाले सुरू |
नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू |

करा जिलेबी आणि मैसूर पाक |
शिरा भात आणि आंबट ताक ||
जाळून टाका मनातील दूषित राख |
निघू दे आलास - पाठीचा बाक

सतत करा भरपूर वाचन आणि अध्यास
वाढू द्या ज्ञान आणि होऊ द्या विकास
करत रहा लिखाण आणि करत रहा अभ्यास
तरच आयुष्याच्या परीक्षेत व्हाल तुम्ही पास

नवीन वर्षाच्या सर्वांना शुभ शुभेच्छा
होऊ देत पूर्ण सर्वांच्या सगळया इच्छा





                               - अंकुश लाटकर