नवे कँलेन्डर

Started by शिवाजी सांगळे, January 01, 2021, 07:20:47 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नवे कँलेन्डर

येतात तारखा जातात तारखा
दिवस उगवतो दिवसा सारखा

दिनदर्शिकेत असूनी अनेक घरे
मुक्काम भिंतीवरी रंगा सारखा

पळते वर्ष रोज चौकोना मधूनी
प्रत्येक चौकोन कागदा सारखा

मजल दर मजल प्रवास सगळा
लाल रंगातल्या सुट्ट्यां सारखा

होई उपयोग आम्हा बारा महिने
वर्षारंभी ठरल्या निश्चया सारखा

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९