वाट चुकलेली

Started by kkomal, March 17, 2021, 11:36:27 AM

Previous topic - Next topic

kkomal

हो आता वाट बदलणार आहे,
चुकीचा वाटेवर आता चालून थकलेय,
ओजळीमध्ये दुख्ख वाट्याला आले
त्या दुःखात पण समाधानी होते
पण आता हृदयाला जखमा आणि रक्तपात होऊ लागले
हो त्यामुळेच  मी आता वाट बदलणार आहे

चुकले होते त्या वाटेवरती आधी पासून माहित होता मजला
हाकेला तुझा भुलले, आज त्या वाटेवरती स्वतःच अस्तित्वच हरवून बसलेय
इतकं त्या वाटेवरती सहन करावं लागेल आधी वाटलेच नवथेरे
प्रयत्न पण केले होते  वाट बदलायचे पण पुन्हा हाकेचे पडसात उमटले,
अंत होतोय आता सहन शक्तीचा, मनाला देखील ओझं आता झेपेना,
हलक तरी कसा करणार मी मन कारण ते ओझेच तू पेलेनाय 
हो त्यामुळेच आता वेळ झालीये ती वाट बदलण्याची
वाट बदलण्यापेक्षा त्याच वाटेवरती आज परत मागे फिरण्याची
पुन्हा एकदा आयुष्य नव्याने जगायची
 
नवीन वाटेवरती वेदनेचा विसर होईल जखम देखील जुनी होईल
विरहाचा आठवणींची पक्की  सवय देखील होईल,
पण जखमांचे वण मनात खोलवर कायम रुतत  राहतील,
वाट बदलण्यापेक्षा त्याच वाटेवरती आज परत मागे फिरायचं
पुन्हा एकदा आयुष्य नव्याने जगायचय
                            K.K.