आठवणी

Started by Dr Rajshri G, March 22, 2021, 12:29:37 PM

Previous topic - Next topic

Dr Rajshri G

                    आठवणी
आठवणीं च गाठोडं आता पेलेनास झालय.
हृदयाच्या कुठल्यातरी कप्प्यातून धूसर  अंधुक जुन्या आठवणी अगदी अलगत तरंगत वर येतात
खरंच जागून गेलोय आपण हे सगळं
मन मात्र मानायला तयार नाहिये
कारण आठवणीच गाठोडं आता पेलेनासा झालय
म्हटलं जरा जागा रीती करूया नव्या आठवणीला जागा देऊया...
कसलं काय चिवट नुसत्या आठवणी
जागच्या हलतच नाहीत
जणू नव्या आठवानिंशी वैर आहे त्यांचा... का माझ्यावर मक्तेदारी गजवायचीय जुन्या आठवणींना....
म्हटलं एकदा सर्व झुगारून द्यावं
जुन्याची जागा नव्याला द्यावी....
पण मन मात्र निश्चल आहे
मनाला कुणाचीही बाजू अशी घायची नाहिये...
पण झुकत मापं मात्र आहे जुन्या आठवणीकडे...
आताश्या जनवायला लागलंय नवीन काही झेपणार नाही आणि जुनं पेलणार नाही...
कारण आठवणीच गाठोडं आता पेलेनास झालय.

ड्रा राजश्री गचकल
त्वचा रोग तज्ज्ञ
Bahrain

Shrikant R. Deshmane

Rajashri ji chan lihliye kavita.
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]