जगायचे कसेतरी

Started by sachinsaregama, March 31, 2021, 04:41:27 PM

Previous topic - Next topic

sachinsaregama

https://youtu.be/1vXPJr7wUx8

कोरोना लॉकडाऊन च्या काळात अवघ्या जगाला मनाकडे बघायला शिकविणारे महान तत्त्वचिंतक डॉ. आनंद नाडकर्णी यांना समर्पित !



रंग मनाचा

रंग माझा, रंग तुझा
रंग नाजुक अल्लड,
कोवळया, हळव्या,
आपुल्या मनाचा,
रंग मनाचा

गोरटा नाही सावळा नाही
सोनेरी चंदेरी माहित नाही
बघता ऐलही जाईल पैल तो
भेटीस चांदण प्रीतीच्या
रंग माझा

लपून छपून चोरुन दुरुन
लाजून हासून हळूच पाहून,
रंग ओला, भाव ओला,
जसा राधेच्या मनात सावळा रंग तो
चित्त चोरटयाचा
रंग मनाचा

गीत, संगीत, संकल्पना -  सचिन चंद्रात्रे



थकलेल्या आणि हरलेल्या अवस्थेत नाडकर्णी सरांच्या मनोविश्लेषणाच्या अनेक दृकश्राव्य श्रृंखला ऐकून मनात उमटलेले हे शब्दसूर रसिकांनी गोड मानून घ्यावे.