आमच खर स्वातंत्र

Started by ranjit sadar, April 15, 2021, 09:46:15 AM

Previous topic - Next topic

ranjit sadar

आमच खर स्वातंत्र
ही म्हणजे चौदा एप्रिल
होता स्वातंत्र्याचा राजा
महुचा भिमराव शुरवीर

स्वातंत्र मिळाया लागला
थोडा अती झाला उशीर
पण बादशाह माझा हा
भिंमराव दिल्लीत खंभीर

माझे भावबंधु साजरे ही
करतात भिमाची एप्रिल
स्वताला त्यांचा अनुयायी
म्हणुन देतात मोलाचा धीर

पण मतदानाच्या वेळेस
यांच्यात पडते मोठी चीर
पैसामुळे समजत नाही
कोण हुशार कोण बधीर

पाचशे रुपायाला मत हे
विकुण करतात किरकीर
भिमाच नाव घेताच यांची
का बंद पडते रक्ताची शीर

त्या भिमान ओढली आहे
कोटी मताची किंमती लकीर
माझा समाज पैसामुळे हा
बनतोय लालचीच फकीर

पुजतो दगड आणि असे
खोटेनाटे सर्व वेगळे पीर
बुध्दाची त्याला पांचट ही
लागते विहारातील खिर

पायशे रुपायाचा समाजा तु
घरात खाऊ नकोस पनीर
सत्याने चल मग साजरी कर
समाजा भिमाची चौदा एप्रिल
            जय भिम
           नमो बुध्दाय

कवी रंजित अंबादास सदर.