सरण सुद्धा थकलय आता...

Started by Rushi.VilasRao, April 18, 2021, 07:34:31 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

वर्षभरात सरेल कोरोना म्हणत म्हणत आर्ध सरल दुसर वर्ष....
माणसालाच माणसाचा पोरका झालाय स्पर्श....
सरण सुद्धा थकलय आता.....
पेटत्या चीता पाहून....
कोरोना योद्धा सुद्धा थकलाय आता....
२४/७ ढीगभर प्रेत उचलून.....
पोलीस सुद्धा दमलाय आता....
वर्ष झाल रस्त्यावर थांबून....
डॉक्टरला सुद्धा सोसेना वेदना....
कोरोना रुग्णाला पाहून....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
सरकार सुद्धा थकलय आता....
लोकांवर निर्बंध घालून....
लोक सुद्धा संतापली आता....
निर्बंध एकुन आणि पोटाला चिमटा काढून....
कोरोना तेवढा हुराळलाय....,
वरचे वर वाढतच चाललाय....
निर्बंध न पाळत रस्त्यावर फिरती लोक पाहून....
रुग्णालयात आता खाटा नाहीत, स्मशाभूमीत सरणावर जागा नाही...
निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन रुग्णालयात दामदुप्पटिने सुद्धा मिळत नाही....
एकटाच रहाणारा कावळा आता स्मशाभूमीत एकटा, पोरका राहिला नाही....
बघत बसतो मजा आयुष्भर पैशाच्या मागे फिरणाऱ्या लोकांच्या प्रेतांची....
वाट बघत बसतात प्रेत कधी येतोय त्या आपल्या नंबरची...
लोकांच्या पेटत्या चीता पाहून तिथला कावळा सुद्धा दमला आहे....
कावळ्याच च काय... पेटत्या चीता पाहून सरण सुद्धा थकलय आता.....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan