माझी स्वताची आई

Started by ranjit sadar, April 22, 2021, 05:22:38 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

माझी स्वताची आई

आई तुझ्यावाणी कोणी नाही श्रीमंत
आज विसरला तूला लेक वाटते खंत
तु ज्ञानाचा सागर आहे धनवाण संत
गातो तुझे गुण वरचा साक्षात भगवंत

या भुवरी तु पवित्र आहेस आई नारी
तु शब्दाचा भंडार या दुनियावर भारी
तुझ्या सेवेने कुणी जातो वैकुंठा दारी
अपरंपार शक्ती तुझ्या पान्ह्यात न्यारी

मला जन्म दिला पेटीत नसतांना गुल
भाकरी खाल्लेल्या मला आठवते चुल
तु पवित्र देह मी त्याची आई आहे धुळ
आज मोठा झालो पण अजुन मी मुल

पोटात असता जीव टाकते ग तु बळी
तुका म्हणे विंचु चावून मृत्यु येतो गळी
त्या क्षणी धगधग करे मरणाचीच नळी
तु जगात सुगंधी गुलाब मी त्याची कळी

( !कवी!) रंजित_ अंबादास_ सदर_.