स्वच्छंदी

Started by शिवाजी सांगळे, April 23, 2021, 07:02:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वच्छंदी

स्वच्छंदी मन माझे...रमते कुठेही
सुखी हसू न् दु:खात रडते कुठेही

पोरांत पोर आणि थोरल्यांत थोर
होण्यास एक प्रयत्न करते कुठेही

गरीब असो वा श्रीमंत कोण कसा
तरी लळा सर्वांनाच लावते कुठेही

होऊन हळूवार फुलपाखरा समान
मनमुराद आनंदाने बागडते कुठेही

सहज सोपे व्हावे जीवन हे आपुले
शोधात स्वतःच्या रे भटकते कुठेही

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९