शुभ लग्न

Started by ranjit sadar, April 25, 2021, 07:43:15 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

पंचवीस एप्रिलला लगीन तीच
आभाळ मनाच माझ्या फाटल
मन रडल प्राण बघीडल माझ
मनात शब्दाच तळ वर साठल

नजर कहर नींदा सर्व मनाला
ह्या माझ्या तीच्यातुन कळत
सरणावर न पसरता हे देहाच
कणकण जोमात अंग जळत

ती जाती ज्या वाटेन मी आज
पण पाही घरातुनही खिडकी
तोंडाला बांधुन जात होती ती
मनाला माझ्या बसतात धडकी

वस्तु भेटतील तुला ग लग्नात
राणी तुझ्या किंमतीच्या साठ
फक्त विसरू नकोस एक पोर
प्रेम तुझ्यावर करतय अफाट

नाही विसरू शकणार तु तो
अकरा नोव्हेंबरचा ग दिवस
त्या दिवशी मी तुला बोलता
देवाला केला होता ग नवस

मन हे माझ तुझ्या चेहऱ्यात
राणी माझ अडकले चंद्रात
प्रकाश पडतो चेहऱ्याचा ग
राणी नको जाऊस अंधारात

तु तर गेली सासरी मी एकटा
वानवाशी सखे राणी राहिन
प्राण जोपर्यंत आहे तुझी वाट
मी राणी कोमल ग पाहिन

कवी रंजित अंबादास सदर.