उगाच वाटतं

Started by शिवाजी सांगळे, May 07, 2021, 10:48:20 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उगाच वाटतं

काहीतरी हरवलयं....सारखं वाटतं
लक्षात नाही येत तरीही असं वाटतं

हरवलयं बहुतेक निरागस बालपण
मोठा झालो मी! उगाच असं वाटतं

संदर्भ बदलले, सुधारल्या जाणीवा
चौकटीत गुतलो सारखं असं वाटतं

बदलावं सारं पुन्हा लहानपण यावं
दंगा मस्तीत जगावं का असं वाटतं

करूनी विचार कळतंच असं नाही 
तरी काही हरवलयं...सारखं वाटतं

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९