कविवर्य श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या 'फोर चॅप्टर्स' या इंग्रजी ग्रंथावर आधारित

Started by Ashish Doshi, May 16, 2021, 03:03:21 PM

Previous topic - Next topic

Ashish Doshi

१. मानवाचे विश्व

अणू रेणू एकमेकांत गुंफले |
प्राण कुणी हे त्यात फुंकले ||१||

अणूबंध सुंदर गुंतागुंतीचे |
आखीव रेखीव कार्य सांधते ||२||

दृश्य जग हे अचंबित वाटे |
बंध हेच गुपित तयाचे ||३||

सर्वव्यापी मानवी मन हे |
त्रैलोक्याला व्यापून राहते ||४||

वास्तव विश्वाचे आकलन हे |
या सर्वव्यापी मनातून होते ||५||

सर्वात्मा जो चैतन्य व्यापतो |
तोच आपल्या मनी वसतो ||६||

प्रेम, ज्ञान, साधनेतून दिसतो |
परी स्व:त्यागातून गवसतो ||७||
-----------------------------------

२. सृजनशील चैतन्य

जीवनाचा घडला चमत्कार |
अनाकलनीय हा आविष्कार ||

एकपेशीय अवतरले पृथ्वीवर |
चैतन्याचा हा प्रकट संचर ||

सृजनाचा हा संकल्प सृष्टीचा |
सकल चराचर उत्क्रांतीचा ||

साधूनी मिलाफ अनेक पेशी-उतींचा |
नियम स्वयम्-नियोजन व सहकार्याचा ||

सहज विचरती जीव भाबडे |
इंद्रियांचे विशेष वरदान लाभले ||

डोलती वृक्ष हिरवेगार |
आपलाच ते वाहती भार ||

असेल उंची जरी लाभली |
स्थिर जाहले एकाच जागी ||

पंखास त्या लाभले बळ |
स्वच्छंद उडे आकाशात ||

वरदान हे त्यांसी मिळाले |
प्रत्येक जीवाचे वैशिठ्य निराळे ||

महाकाय प्राण्यांचे आगमन येथ |
शारीरिक विस्ताराचा प्रयोग एक ||

एकेकाळी व्यापली पृथ्वी |
आता मात्र उरली कीर्ती ||

शोकांतिका ही संस्मरणीय ठरली |
पुन:र्निर्मितीत सृष्टी गुंतली ||

तिने योजले अनाकलनीय अगम्य |
प्रसवला परी पृथ्वीवर मानव ||

ब्रम्ह स्वतःची अनुभूती घेत |
मानवी मनातून व्यक्त होत ||

सर्वात्म्याने साहस ते केले |
घातक मन हे जीवात रोवले ||

स्थलकालातीत, स्वच्छंद, उपरे हे मन |
सृष्टीचे त्यास उमगे ना नियम ||

मन:शक्तीचा संकल्प ठाम |
जीवनशक्तीला सक्तीचा त्याग ||

मानव बनला स्वतः रचीता |
प्रगत साधनांचा थोर निर्माता ||

बाह्य साधनांचा होता विकास |
मानवी प्रवृत्तीशी घडे विसंवाद ||

साधने निपाजली सत्वर अनेक |
नुरला मानवाचा आत्मिक संबंध ||

मूळ नाट्याची बदलली संहिता |
निवृत्त होता हळूच सर्वात्मा ||

नायक बनला प्रेक्षक जरी |
प्रस्तुत समयी सहाय्य करी ||

मानव जरी हा पुत्र सृष्टीचा |
शासक बनला स्वनिर्मित राज्याचा ||

भोतिकतेच्या एेहिक जीवनात |
ऐशोरामाच्या उल्हास धुंदीत ||

परिपूर्णतेचे परी स्वप्न अपूर्ण |
अलिप्ततेमध्ये गवसले सत्य ||

येथे मग उगम धर्माचा |
अनंतात या शोध स्वतःचा ||

जसे असंख्य पेशी शरीरात जगती |
मानवी शरीर न उमगे तयांसी ||

तसे सर्वात्मा तो एकच तरीही |
मानवप्राणी भ्रमात राही ||

इतरांत जेव्हा आपणाला पाही |
अत्यानंद मानवास होई ||

हीच साक्ष त्या परमात्म्याची |
अंतिम सत्य हे पूर्णत्वास जाई ||

------------------------------------------
आशिष दोशी
कोल्हापूर,९४२१०३४४५२