कविवर्य श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या 'फोर चॅप्टर्स' या ग्रंथावर आधारित-भाग २

Started by Ashish Doshi, May 16, 2021, 03:07:48 PM

Previous topic - Next topic

Ashish Doshi

३. मानवातील अतिरिक्त

जन्मजात उन्माद अंगी बाणला |
इच्छितो निसर्ग योजनेत सुधारणा ||

सौरमालेतील धूमकेतू जणू |
खुळचट धाडस जाणे करू ||

दोन पायावर उभा राही |
दोन हातांची सुटका झाली ||

नियतीची हि तऱ्हाच भारी |
मानवी संघर्ष फळास येई ||

पशूंची उत्क्रांती जरी सरळमार्गी |
मानवी उत्कर्ष परी बहुरंगी ||

दृष्टी लाभली अशी अलौकिक |
पाही परस्परसंबंध सृष्टीतील ||

कृती-स्वातंत्र्य व दृष्टी-स्वातंत्र्य लाभले |
कल्पनाशक्तीतून मानसिक स्वातंत्र्य साधले ||

रचित्याने ठेवला असा अपूर्ण |
उघडा, अशक्त आणि नि:शस्त्र ||

दैवी देणग्या उसन्या परी मिळता |
मार्ग सर्जनशीलतेचा हा गवसाला ||

जीवाअंगी स्वसंरक्षणाची सहजप्रवृत्ती |
निडर मनी कल्पनेची उत्तुंग भरारी ||

अधिवास जेथे बहुमोल मूल्यांचा |
सन्माननीय यजमान हा सर्वत्म्याचा ||

स्वातंत्र्याचा मानवी पुरस्कार |
आत्मज्ञानाचा होई विस्तार ||

वैश्विक सत्य जाणण्याचा यत्न |
भौतिक अस्तित्वापेक्षा  हा अतिरिक्त ||

अशी अभिलाषा का मनी बाळगे ? |
असे सत्य खरेच असते का हे ? ||

स्थलकालातीत नैसर्गिक अंत:प्रेरणा ही |
शाश्वत व सार्वत्रिक सत्यशोधनाची ||

हिरे माणके गोळा करतो |
अनंताची अभिलाषा धरतो ||

विलक्षणाची लागता आंस |
क्रौर्य कल्पिते विद्रूप चित्र ||

फाजील अवास्तव आडदांड |
दैत्य पुजतो अक्राळ विक्राळ  ||

मनी जाणतो सत्य अलौकिक |
भासे परिपूर्ण तरी नसे अनंत ||

मानवी सभ्यतेचे उत्तुंग प्रयत्न |
दुर्दम्य इच्छाशक्तीचे नवल सामर्थ्य ||

भौतिक प्रगतीत ना शाश्वत समाधान |
आत्मिक शांतता केवळ अंतिम सत्यात ||

बुचकळ्यात टाकती प्रश्न अनेक |
कोण मी ? कोण हे मानवी मन ? ||

शतके किती विचार करितो |
अंतिम निष्कर्षाप्रती ना पोहोचतो ||

गुंतागुंतीचे धर्म सिद्धांत मांडतो |
नैसर्गिक व्युत्त्पत्तीचे मूळ शोधतो ||

विविध धर्मांचा नैतिक तपशील वेगळा |
परी शोध दैवी सर्वोच्च तत्वाचा ||

मन हे शास्त्रोक्त रचत सिद्धांत |
करी धर्माची थट्टा उपहास ||

परी त्यासी हे उमगावयास हवे |
धर्म वैश्विक हा कल्पित नोहे ||

मानवी आत्म्याशी स्वतःस पाही |
याच्या अस्तित्वाचे समर्थन हेचि ||

मानवी विक्षिप्तता धर्मांध होता |
भौतिकता अंध अन दोषार्ह तात्विकता ||

उत्तरेही परी ठरती चुकीची |
विकृत करी हे सत्य मानवी ||

विधी, व्रते, पूजा-अर्चा, जात, पंथ |
उरली महाभयंकर कर्मकांड ||

मानव करत आला उपासना शक्तीची |
वैश्विक शक्ती द्वारे लाभे परिपूर्ती ||

कोणती शक्ती असेल हि नेमकी ? |
अमूर्त अर्थशून्य निष्ठुर असे देवत्व असेल का कधी ?  ||
---------------------------------------------------

४. अध्यात्मिक ऐक्य

होता पूर्ती मानवी उपजीविकेची |
गूढ स्व:अस्तित्वाचे विस्मित करी ||

होई पूर्णत्वाची आत्मानुभूती
जाणता संबंध अखंड मानवतेशी

व्याख्या नेमकी काय विश्वाच्या अनंततेची ?
अनिश्चित अमर्याद वाढ असीमतेची ?

हिंदु शास्त्र सांगे विश्व हे अंडाकारी
ही विश्वाची मर्यादा की मानवी परिघाची

अनंत अवकाश काल अनादि
यात सीमित, विश्वाची लय व उत्पत्ती

आंतरिक परिपूर्णता येता ठाई
कमळात सुंदरता पाहे दृष्टी

एकरूप चित्त होता विश्वाठायी
मनी उमटे अनंत हर्ष अन् प्रीती

अध्यात्मिक शक्ती क्षीण ज्याची
मालकीहक्काचा हव्यास सदा प्रौढी

सत्य अनंताचे एकच परी
अद्वैत हेच सदा अनादि

उमगे सत्य हे विलग नाही
होता एकरूप आंतरिक सत्याशी

भोग तो नांदतो मनाठाई
दाही दिशांचा पिंजरा हा रची

योग साह्य करी, पिंजरा सोडण्यासाठी
मग परमानंद मनास अनुभवा येई

मरणाची देखील मग भीती नाही
जाणता सर्वात्म्याला जो सर्वात राही

विश्वकर्मा तो स्वयम् जाणावा मुळी
स्वर्गीय जो सर्वांच्या हृदयात राही

जाणता त्यास सर्व सीमा लांघती
मर्त्य मानवाचे पूर्ण सत्य अनुभवती

सर्वात्म्याशी योग तो निष्क्रियास नाही
लाभे त्यास जो स्वार्थ सोडुनि सर्वांसाठी कार्य करी

ना कोणा फसवी ना तिरस्कार करी
ठेवी अनुकंपा व प्रीती सर्वाभूती

हाव ती चैतन्यास लागे एेहीकतेची
ना नवनिर्मितीचे समाधान ना एकात्मतेची तृप्ती

अधाशी या स्वार्थ सुखांच्या चढाओढी
मानवता अंधुक होई, खरी शोकांतिका ही

माने कठोर तथ्य प्रमाण, जे दिसते दर्शनी
परी बिजातला अंकुर जसा, स्तब्ध अासवे ढाळे मुक्ती

आंतरिक मुक्ती वसे सत्याच्या ठिकाणी
अनंतात जे राहते सर्वात्म्याच्या हृदयी

--------------------------------------------------------
आशिष दोशी
कोल्हापूर, ९४२१०३४४५२