काय होईल युद्धाची परिणती ? (युद्ध नको , बुद्ध हवा)

Started by Atul Kaviraje, May 18, 2021, 02:46:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    आजच्या  घडीला  पर -राष्ट्रात  जे  युद्धाचे  पडघम  वाजताहेत , त्यात  अनेक  राष्ट्रांची   नावे  जी  कधी  या  युद्धात  अडकतील  असे  वाटले  पण  नव्हते  , ती  पुढे  येताहेत . इस्त्रायल , अरब , मुस्लिम , पॅलेस्टाईन , हमास , तेल  अवीव  , आणि  बरेचसे . जमिनीच्या  तुकड्यासाठीचा  हा  संघर्ष  एक  नव्हे , दोन  नव्हे  तर  तब्बल  170 ते  175 वर्षांची  परंपरा  राखून  आहे . ज्यू   , अरब , मुस्लिम , पॅलेस्टाईन , ख्रिश्चन     असे  जाती  समुदाय  यात  ओघा -ओघाने  ओढले  गेलेत.

     ही युद्धाची  ठिणगी  काही  दिवसांतच  अक्राळ -विक्राळ  अश्या  वणव्याचे  रूप  धारण  करीत  आहे . पण  या  अश्या  जमिनीच्या  हव्यासापोटी , प्राण  जाताहेत  ते  फक्त  निष्पाप , सामान्य  नागरिकांचे . आपण  उभे  आहोत  विज्ञानाच्या , भविष्याच्या  उंबरठ्यावर , आणि  आपले  विचार   आहेत  पुरोगामी . कुठे  तरी  हे  थांबायला  हवे , फक्त  एका  अखंड  भू -भागासाठी , एकमेकांत  युद्ध  का  हवे  ? समजुतीने , एकत्र  येऊन  हा  तह  घडू  शकत  नाही  का  ? त्यातच  माणसाचे  हित  आहे . सर्व  युद्ध  राष्ट्रांनी  एकत्र   येऊन , सल्ला -मसलतीने  युद्ध -बंदीचा  एकमताने  विचार  केला , तर  तो  स्वागतार्हच  आहे , त्याने  माणसांचे  प्राण  वाचतील , व  माणुसकीचे  दर्शनही  घडेल .