☺आठवण ☺

Started by Sandhya Gadge-Sinnarkar, May 20, 2021, 09:36:48 AM

Previous topic - Next topic

Sandhya Gadge-Sinnarkar

☺आठवण ☺

विसरलीस तू  मला
तरीही  मी  नाही  तुला  विसरणार
ढगातून  येणाऱ्या  पावसाच्या  धारा
पाहायचं  मी  नाही सोडणार....... 


नाही  आली  माझी  आठवण  तरीही  चालेल
पण  तुझी  आठवण  काढायला  मी  नाही  विसरणार
मुसळधार त्या  अमृतधारांमध्ये
भिजण्याचं  मी  नाही  सोडणार .......


नाही  माझ्या  सुखात  सामील  झालीस  तरीही  चालेल
पण  तुझ्या  सुखात  सामील  होण्याचं  मी  नाही  सोडणार
माझा तो आनंद  पावसात  जाऊन 
व्यक्त  करण्याचं  मी नाही  सोडणार....... 


नाही  माझ्या  दुःखात  सामील  झालीस  तरीही  चालेल
पण  तुझ्या  दुःखात  सामील  होण्याचं  मी  नाही  सोडणार
माझे  ते  अश्रू  पावसाच्या  धारांमध्ये
लपवण्याचं  मी  नाही  सोडणार ......


विसरलीस  माझा  चेहरा  तरीही  चालेल
पण  मी  तुझा  चेहरा  नाही  विसरणार
पावसात  भिजत  असताना  डोळे  बंद  करून
तुझा  चेहरा  आठवण्याचे  मी  नाही  सोडणार ......


विसरलीस  माझ  नाव   तरीही  चालेल
पण  मी  तुझे  नाव  नाही  विसरणार
तुझे  नाव  त्या  पावसाला  जाऊन
ऐकवण्याचे  मी  नाही  सोडणार ......


नाही  माझ्यासाठी  कधी  गाणी  गुणगुणलीस  तरीही  चालेल
पण  मी  तुझ्यासाठी  गाणी  गुणगुणण्याचे  नाही  सोडणार
माझं  ते  गाणं  पावसाला  जाऊन
ऐकवण्याचे  मी  नाही  सोडणार .......
                     .......संध्या  गडगे -सिन्नरकर

Atul Kaviraje

 
     मॅडम संध्या, आपली सद्य लिखित कविता "आठवण" अतिशय आवडली. या कवितेतील प्रेमी आपल्या प्रेमिके बद्दलचे आपले मत व्यक्त करीत आहे. कधी काळी त्या दोघांची भेट हि पावसात झाली होती, तिथेच त्यांचे प्रेम - सूर जुळले होते. उत्कट असे नाते तयार झाले होते. परंतु काही कारणास्तव, हे त्यांचे प्रेम काही टिकले नाही. व प्रेमिका प्रेमापासून विभक्त झाली, व जवळ जवळ आपल्या प्रेमाचे विस्मरण तिला झाले.

     या कवितेतून हा प्रेमी तिला आपली पावसातील आठवण करून देत आहे, ते जगलेले क्षण तो तिला विदित करीत आहे. व ताटा-तूट होता, पावसालाच माध्यम धरून, तो आपले मनोगत व्यक्त करीत आहे.
त्याचे तिच्यावर आजही तितकेच प्रेम आहे, तो तिला कधीच विसरू शकत नाही, म्हणून जेव्हा जेव्हा पाऊस पडत असेल, तेव्हा तो त्या आठवणींना उजाळा पावसातच भिजून देत आहे.

     उत्कट अशी प्रेम भावना, तो त्या पावसासच कथित करीत आहे. आपल्या कवितेतून लिहिलेल्या हळुवार भावना मनास स्पर्श करून गेल्या. अशाच सुंदर कविता लिहीत जा, आपल्या कविता लेखनाच्या पुढील  प्रवासास  माझ्या  मनापासून शुभेच्छा .

     रे पावसा, नको देऊस ती आठवण
     भाव-भावनांची, सुख दुःखाची साठवण
     माझी प्रिया सोडून गेली तरी
     शेवट-पर्यंत कर माझी पाठ-राखण.

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-२९.०५.२०२१-शनिवार.

Sandhya Gadge-Sinnarkar

 धन्यवाद सर :)