पैसापिसाट

Started by कदम, May 21, 2021, 02:34:02 AM

Previous topic - Next topic

कदम

कविता ÷ पैसापिसाट
-------------------------------------
पैसा पिसाट असलेल्या मार्गांवर
फक्त चेतावनी खोर भेटतात
पैसा असणे किती सुरक्षीत आहे
हे पैसा नसलेले जाणतात
पैस्याच्या मागे धावणारे कधी दमत नसतात
दमतात दमतात पैसैवाल्याच्या मागे धावणारे
नेमका समाजामध्ये मोठे स्थान मिळवण्यासाठी
चुरसी चाललेल्या असतात
या चुरशीला बगल देणारे खंडणीखोर जन्माला येतात
विना कष्ट काही कमवू नये
कष्टाचे असे काही कमवत नसतात
कष्टाचे इष्ट अनिष्ट ओळखून तेही पिसाटतात
शासकीय तिजोरी घरची तिजोरी
कंपनी बँक सर्व काही ही पैसापिसाट वृत्ती लुटत असते
रितसर मार्ग पण ऐपत ठेवणार्यासाठी खुला असतो
या मार्गावर कमकुवत दुबळे अशिक्षीत भुमीहीन कर्महीन
असे उपद्रवी थकबकतात
-------------------------------------
-कदम.के.एल.