घरकाम करणारी बाई

Started by Atul Kaviraje, May 22, 2021, 02:38:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                       घरकाम  करणारी  बाई
                       --------------------


आजची स्त्री हि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उतरली आहे, ती आज गरती झाली आहे, जाणती झाली आहे, ती आज कमावते आहे, पुरुषाचा थोडा फार का होईना भार तिने नक्कीच कमी केला आहे, अशी हि वंदनीय स्त्री आज चूल आणि मुल या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी आपलेपणाने, व्यवस्थितपणे पार पडत आहे.


पण इथेच तिला गरज आहे एका मदतीची, कारण ती  काही पूर्ण नाही, मनुष्य प्राणी म्हटला कि त्याला काही मर्यादा, काही बंधने हि आलीच, या गृहिणी चेही  तसेच आहे, तिला घरकामात मदत हि लागणारच, कारण नोकरी करून संसार सांभाळणे आणि तेही वेळेच्या मर्यादेत हे जवळ जवळ अशक्यच आहे, तिला मदतीची, कुणाच्या तर सहकाऱ्याची गरज भासते, आणी ती पूर्ण करणारी फक्त एकच व्यक्ती असू शकते, नि महणजे घरकाम करणारी बाई ( येथे मोलकरीण म्हणणे रास्त ठरणार नाही  )


तर अशी हि बाई मग सर्व घरकाम करते, मालकीण बाई नोकरीवरून येईपर्यंत ती सारे घर आवरते, काम आटोपते, आणी मग आपल्या घरी निघून जाते, मागे असे बरेच किस्से वाचनात आले होते कि, या नोकरी करण्यार्या स्त्रिया अश्या बाईंचा गैर-फायदा घेऊन त्यांना राब राब राबवतात, आणि पगाराच्या  नावाखाली मर्यादित पैसे, ठरलेल पैसे हाती देतात, त्यांनी मागितलेला बोनस, अधिक पैसे यांची मागणी त्या चक्क फेटाळून लावतात,  त्यांना कधी सुट्ट्याही दिल्या जात नाहीत  त्यांच्या गरिबीचा, मज-बुरीचा गैर-फायदा घेतला जातो, आणी असे बरेचसे गैर  वर्तन त्यांचेशी त्या वेळी केले जात होते,


मला आठवत, मग या अश्या बाईंच्या पाठीशी सरकार उभ राहील होत, त्यांचा एक समाज ,एक गट ठरवून दिला गेला होता, त्यांना पास हि दिला गेला होता, त्याच्या कामाच्या वेळा, त्यांचा पगार ठरवून दिला गेला होता, आणी कोणी त्यांचा फायदा उचलला तर अश्या मालकी णी-च्या  विरोधात त्यांना गाऱ्हाणे घालण्याचा चक्क अधिकार दिला गेला होता

                       

     सांगण्याचा मुद्दा असा की, त्यांनाही, आपण आपल्या कुटुंबातील सभासद का मानू नये ?
त्यांच्या सुख-दुःखात का समरस होऊ नये ? त्यांना सापत्न भाव का द्यावा ? हा रोजंदारीचा समाज तोही माणसांचाच आहे ना ? मग त्यांना आपण वेगळे का मानावे ? त्यांना समतेचा दर्जा का देऊ नये ?

     काही तरी मजबुरी म्हणूनच त्या अशी दुसऱ्यांच्या घरातली कामे करीत आहेत. त्यांचा आपण आदर ठेवावयास   हवा. त्यांना आपलेसे करायला हवे. माणुसकी दाखवायला हवी. हे जेव्हा घडेल तेव्हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसा बद्दलचे प्रेम, आपुलकी, आदर-भाव, ठळक पणे दिसून येईल.


-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-शनिवार-22.05.2021.