चारोळी - लेख - "पाउस व बळीराजा"

Started by Atul Kaviraje, May 23, 2021, 05:16:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        चारोळी - लेख - "पाउस व बळीराजा"
                        --------------------------------

जमीन भंगली, शेतही सुकले
वाट पाहुनी डोळेही भरले
ये रे पावसा, नको देऊ कष्ट,
बळीराजा विनवणी करतोय स्पष्ट
================


     हि त्या महिन्यातली गोष्ट म्हणजे जून मासातली, पूर्ण महिनाभर पाउस पडलाच नव्हता, त्याने माहित नाही, दडी मारली होती, कि नाराज झाला होता, पण त्याचे काहीतरी बिघडले होते, हे नक्की,

     तेव्हा आम्ही सर्वांनी या वरुण-राजाची करुणा भाकली होती, कि आता तरी तुझा रुसवा सोड. आणि एकदाचा पड, इथेही पड आणि त्या शेतातही पड, कि जिथे शेतकरी दादा तुझी आतुरतेने वाट पहात आहे, कि ज्याला आमच्यापेक्षाही जास्त तुझी गरज आहे,


    पहा त्याच्या शेतात जाऊन पहा, जरा, ते पाहून तुझ्या हि डोळ्यात त्या बलीराजाप्रमाणेच पाणी येईल, पहा त्याचे पिकांनी डोलणारे शेत कसे सुकून गेले आहे, जमीन तर एखाध्या वाळवंट- प्रमाणेच  भासत आहे, सुकून ती नापीक झाली आहे, जमिनीत खड्डे पडले आहेत, पाणी नसल्यामुळे ती अक्षरशः फाटून गेली आहे, ओढे, विहिरी नदी नाले, सर्व कसे ओस पडले आहे, शेतकऱ्याचे त्या बळीराजाचे जीवन तर या सर्वांवर अवलंबून असते, आणि जर पाणीच नाही तर त्यानेही जगायचे कसे ?


     त्याचे पाण्याने भरलेले, अश्रुनी भरलेले डोळे तुला स्पष्ट दिसत आहेत ना? त्याची तुला पाडण्यासाठी केलेली विनवणी स्पष्ट ऐकू येत आहे ना ? तेव्हा दया कर, त्याच्यावर, आम्हा मानवावर कृपा कर, आमची करुणा ऐक,व शेवटी पड बाबा, मनापासून पड, त्या शेतकऱ्याला खुश कर, त्याच्या डोळ्यांतले पाणी पूस, त्याचे  अश्रू धुवून टाक, मनापासून पड.


-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-23.05.2021-रविवार .