"गुरु -पौर्णिमा"

Started by Atul Kaviraje, May 24, 2021, 10:46:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "गुरु -पौर्णिमा"
                                   -------------


     दरसाल  प्रमाणे  गुरु -पौर्णिमा  हा  दिवस  मराठी  काल -निर्णयात  ठळक  दिसून  येतो .

     गुरूची महती सांगणारा हा दिवस, गुरूला भ -ज-णारा   हा शुभ-दिवस, त्यांची  पूजा करण्याचा हा दिवस.
तर या गुरुचे वर्णन संतानी त्यांच्या वाणीतून अभंगातून अखंड समोर मांडले आहे.गुरु नाही तर  मोक्ष नाही, गुरु नाही तर सोक्ष नाही.

    मनुष्य जन्माला आल्यानंतर जर का त्याला कोणा गाईड चे मार्गदर्शन नसेल तर त्याच्या जीवनाला काहीही अर्थ रहात नाही,हा गाईड म्हणजेच त्या त्या मनुष्याचा गुरु, त्याला खरे शिक्षण देणारा गुरु,
त्याला  समाजात पुढे आणणारा गुरु, समाजात मानाने जगायला शिकवणारा गुरु, आणी बरंच काही.
तर मित्रानो या गुरूची महती सांगावी वर्णावी तेवढीच थोडी, या गुरूला तोड नाही, असे कोणीही होणार नाही, असे कुणी झाले नाही.

     तर मित्रानो  या अश्या गुरूंच्या रांगेत सगळ्यात प्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे आपल्या आईचा
जन्म देणे, पालन पोषण करणे, वाढवणे, घडवणे, शिकवणे, यादी कमीच पडेल, आपल्या मुलांसाठी कष्ट घेणे, रात्रीचा दिवस करणे, आणि हे फक्त आईच करू शकते, म्हणून ती माझा प्रथम गुरु.

     या नंतर    नंबर  लागतो तो वडिलांचा  .आईबरोबर   वडिलांचाही  या वरील  उल्लेखलेल्या  यादींमध्ये  प्रामुख्याने   हात  असतो ,  जन्म दिल्यानंतर  मुलाच्या  प्रत्येक   क्षणाची  जबाबदारी  वडीलच  उचलत  असतात  ,  म्हणून ते  माझे  दुसरे  गुरु.

     त्यानंतर  आपण  शाळेत  जातो  योग्य  ते  शिक्षण घेतो . पुढे जातो  मोठे   होतो , नाव  मिळवतो , इत्यादी  इत्यादी , तर आपल्याला  हे शिक्षण देणारे  तिसरे  गुरु म्हणजे आपले  शिक्षक. 

     त्यानंतर  गुरूंची  यादी  वाढविण्याचे  काम  आपल्या  हाती  असते , ज्याला  जसे  आवडेल  ज्याच्यावर  ज्याची  मर्जी  बसेल  तो त्याचा  गुरु.

     सर्वात  प्रमुख  म्हणजे तो देव  ईश्वर  ज्याने  हे जग  निर्माण  केले आहे, ज्याने 
आपल्याला जीवन  दिले  आहे, पण  त्या देवालाही  गुरु असतो ,  म्हणून तो देव   कधी  कधी   सांगत  असतो , कि  मला  भजण्यापेक्षा   तुम्ही  तुमच्या  आई -वडिलांना  प्रथम मान  द्या , कारण  त्यांनी   तुम्हाला  कष्ट करून  जोडे  झिजवून
मोठे   केले आहे, त्यांचे  तुम्ही  उतराई  व्हा .


     अश्या या वर  उल्लेख  केलेल्या  सर्व  गुरूना  या पावन  दिना  निमित्त  वाकून   
नमस्कार  करतो , व त्यांच्या   चरणांची  पूजा करतो.


-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-सोमवार - 24.05.2021.