वेडे मन ......

Started by Sandhya Gadge-Sinnarkar, May 25, 2021, 09:23:51 AM

Previous topic - Next topic

Sandhya Gadge-Sinnarkar

वेडे मन ...... :angel:

निळ्या आकाशी घेउनी भरारी
मन हे माझे हरवूनी गेले
क्षणभर जणू सृष्टिवरचे
अस्तित्वच संपून गेले

जेव्हा अफाट निळ्या नभी
एकटे मन फिरू लागले
स्वतंत्रता काय असते
तेव्हाच जणू उमजले

वाटले तिथून एकदा
नजर फिरवावी मनाची
आणि करावी पारख
भिन्न - भिन्न त्या मनांची

वाटले खोट्या लोकांना
तिथुन कठोर शिक्षा करावी
अन भोळ्या - भाबड्या लोकांची
मायेन झोळी भरावी

मन हे झाले वेडे पिसे
सैरा वैरा फिरुनी
आगळया - वेगळया मनांची
व्यर्थ पारख करुनी

करुनी पारख मनांची
मन हे माझे थकले
खेळ होता हा मनाचा
मन माझे थोडे चुकले

मन माझ भांबावलं
घेता मनावर सृष्टीचा लगाम
कृपाळू , दयाळू ,परमेश्वराला
माझ्या छोट्या मनाचा सलाम

...... संध्या गडगे - सिन्नरकर

कदम

फारच छान मन हे वेडेच
त्याला चांगल्याचेच तेवढे वेड
🙏

Atul Kaviraje

     मॅडम संध्या, वेडे मन या आपल्या आताच्या कवितेत, मनाचा चांगुलपणाच कथित केला आहे, यावरून मी आपल्या स्वभावाची पारख करतो, व कवितेस दाद देतो.

     मनास बंधनात ठेवणे, हे आपल्या कधीच हाती नसते, ते मुक्त असते, निर्बंध असते, स्वतंत्र असते. मन मुक्त होऊन मोकळ्या अंबरी विहरताना त्यास जे चांगले-वाईट अनुभव आले. ते आपण कवितेतून मांडले आहेत. आपल्या भावनांची मी कदर करतो.

     दाही दिशा मुक्त मनास
     नाही जुमानत ते बंधनास
     मनाची व्याख्या नाही काही
     अतर्क्याचाही ते वेध घेई.

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-२७.०५.२०२१-गुरुवार.