...कुणीतरी आवडलं होत

Started by harishnaitam, May 26, 2021, 11:32:41 AM

Previous topic - Next topic

harishnaitam

...कुणीतरी आवडलं होत

आयुष्यात पहिल्यांदा मनाला
कुणीतरी आवडलं होत
तिच्यावर मी मनापासून
खरंच प्रेम केलं होत ||

कधी न बोलणारी चक्क
माझ्याशी बोलायला लागली
बोलता बोलता सवय जडली
ती मनात घर करून बसली ||

जिवनात पहिल्यांदा कुणाच्या
तरी इतका जवळ गेलो होतो
बघताच काय तिच्या प्रेम
जाळ्यात ओढल्या गेलो होतो ||

तिला माझी होशील का
असं विचारलं होतं
तिने मात्र नकार दिल होत
अन् मन माझं सुन्न झालं होतं ||

मी बोलणं बंद केलं होतं
तरी ती माझ्याशी बोलण्याचा
हट्ट कायम धरत होती
मनाला पाझर फोडत होती ||

तिच्या बोलण्यात मात्र कायम
अप्रत्यक्ष होकार दिसत होता
ती माझी परिक्षा बघते कि काय
मात्र प्रत्यक्ष नकारच देत होती ||

मी वेडा तिच्याच प्रेम विहारात
अजूनही तिची आस घेऊन जगतो
माझ्या एक तर्फी प्रेमाला
तिचा होकार समजून बसतो ||

खरंच आता ती नक्कीच
माझा स्विकार करेल असा
मी ठाम सांगतो आणि
माझंच ती प्रेम आहे मी समजतो ||

कवी : हरिष नैताम (२४ मे २०२१ , सं. १०.३०वा.)

Atul Kaviraje

     हरीश सर, एक हळुवार, मनाला चाटून जाणारी, सुन्न करणारी , काहीसा दुःखद असा शेवट असलेली हि कविता वाचून, मन  व्यथित झाले. हाच शेवट असतो का एकतर्फी प्रेमाचा असा काहीसा संशय येऊ लागतो. कुणीतरी आपल्याला आवडत, परंतु तिकडून होकार न येता नकार येतो, आपण प्रेम करून काही चूक तर करत नाही ना, असा प्रश्न नेहमीच पडतो.

     माझ्या वेड्या मनाला शेवटी मी समजावतो कि, जे घडलं ते एक मृगजळ होत, भासमान धुकं होत जे पहाता - पहाता विरून गेलं, तरी मला अजूनही आशा आहे कि ती माझ्या प्रेमाला साद देऊन माझी होईल . तोपर्यंत मी तिची वाट पाहीन- खरंच या कवितेतील प्रेमीची ही इच्छा पूर्ण होऊन ती शेवटी त्याची होईल.

     धुके विरले, ऊन पडले
     पहाता पहाता लख्ख उजाडले
     मनास वेढलेले  जळमट  हलकेच
     मनानेच समजुतीने बाजूस केले.

     तरी आशेवर जगतो आहे
     अशीच पहाट पुन्हा उजाडेल
     आणि जीवन नव्या उमेदीने
     पुन्हा एकवार जोमाने बहरेल.

      कवितेच्या आपल्या  पुढील प्रवासास अनेक शुभेच्छा .

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-२६.०५.२०२१-बुधवार.