"आई -वडिलांचा मुलांसाठी सिने -सृष्टीत वशिला "

Started by Atul Kaviraje, May 27, 2021, 12:47:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

            "आई -वडिलांचा  मुलांसाठी  सिने -सृष्टीत वशिला "
            -------------------------------------------

   जो तो उठतो , आपल्या मुला मुलीना सीने सृष्टीत  ढकलायचा प्रयत्न करतो, अगदी रूप नसताना, गुण नसताना, अगदी काही म्हणजे काहीही नसताना, म्हणतात ना जिकडे तिकडे वशिला चालतो, इथे फक्त बापाचा ( वडिलांचा ) वशिला कामी येतो, कुठे टिकला नाही निदान सिनेमात तरी टिकेल या दृष्टीनेच हे वडिलांचे प्रयत्न सुरु असतात, मग मुलाचे. मुलीचे पदार्पण सीने-सृष्टीत होते, अभिनय चांगला जमला तर प्रेक्षक दाद देतात, पिक्चर बर्यापैकी चालतो, पुन्हा एकवार चान्स मिळतो, नाही चालला, तर दाणकन आपटून, त्याना कुठच्या कुठे भिरकावून देतो,

    असो, हे नेहमीच चालते, आई वडील चालले म्हणून मुलगा, मुलगी चालेल हे गणित काही जमत नाही, किंवा कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखे वाटते, एक दोन गाणी फेमस झाली, किंवा एक दोन डान्स बर्यापैकी जमले, आणी ते पिक्चर चांगले चालले,कि आई वडिलांना आभाळ गाठल्याचा आनंद होतो, पण दुसर्याच क्षणी, ते जमिनीवर आपटतात, हे सुज्ञ प्रेक्षकांस सांगणे नलगे,


    असो, माझी कळ कळीची विनंती या आई वडिलाना आहे,  कि आपल्या मुलांना पुन्हा आपल्या ओळखीने तिथेच  पेस्ट करायचा किंवा चिकट वायचा खोटा, बेगडी प्रयत्न न करता, त्याना कुठल्या क्षेत्रात जास्त आवड आहे,जास्त रस आहे  ते त्याना करू द्या, आपण या सृष्टीत चाललो म्हणून आपली मुलेही चालतील, असा खोटा विश्वास बाळगू नका, त्यांना त्यांचे जीवन जगू द्या,म्हणजे  तुम्ही सुखी व्हाल आणी तेही सुखी होतील.

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-27.05.2021-गुरुवार.