चारोळ्या पावसाच्या - (भाग-२)

Started by Atul Kaviraje, June 02, 2021, 01:16:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     चारोळ्या पावसाच्या
                          (भाग-२)
                     ----------------

1) खूष पाउस

पाउस धावतो आहे, पाउस पळतो आहे
पाउस दडतो आहे, पाउस पुन्हा दिसतो आहे
पाउस नाचतो आहे, पाउस भिजवतो आहे,
मी समजलो, पाउस आज खूष आहे.

2) वरदान पावसाचे

मन करा रे प्रसन्न
पाउस एकच आहे वरदान
आम्हा जलामृत पाजुनी,
दिलंय जीवनाचे दान.

3) प्रेम व पाउस

प्रेम हे पावसातच घडते
प्रेम हे पावसातच फुलते
प्रेमाचा दुजा ऋतू नाही,
असे काय या पावसात असते ?

4) वार्धक्य व पाउस

वृद्धत्त्वाचे, अनुभवाचे ऐक तू बोल
पाऊसच आहे माझ्या  साक्षीला
प्रत्येक पावसाळे मी पाहिले,
केस माझे उगीच नाही पिकले !

5) पाण्याची ओंजळ

पावसाचे पाणी ओंजळीत घेतो
तसेच मग खूप वेळ ठेवतो
साठवलेल्या त्या छोट्या जलाशयात,
मला तुझाच चेहरा दिसतो.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.06.2021-बुधवार.